नेमकं काय घडलं?
जागतिक बाजारात जरी काही प्रमाणात घसरण दिसत असली, तरी भारतीय बाजारपेठेत चित्र पूर्णपणे वेगळं आहे. अमेरिकन डॉलरचा निर्देशांक वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने खरेदी महागली आहे. चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरियामध्ये लूनर न्यू इयरच्या सुट्ट्यांमुळे व्यवहार थंडावले आहेत, ज्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होत आहे. चांदीच्या किमतीत गेल्या तीन दिवसांत किलोमागे १५ हजारांची घसरण झाली होती, पण आज पुन्हा ४,६६६ रुपयांच्या वाढीसह चांदी २,३३,४४९ रुपयांवर व्यवहार करत आहे.
advertisement
सोन्याचे दर
२४ कॅरेट: १,५५,५२१ रुपये
२२ कॅरेट: १,४२,५८२ रुपये
१८ कॅरेट: १,१६,६४० रुपये
शहरानुसार सोन्याचे दर
मुंबई- १,५४,१९०
दिल्ली- १,५४,३४०
पुणे / बेंगळुरू- १,५४,१९०
चांदीची चेन्नई एक्सप्रेस सुसाट!
चांदीच्या बाबतीत आज चेन्नईने देशात बाजी मारली आहे. दिल्ली आणि मुंबईत चांदी २,५९,९०० रुपये प्रति किलोने विकली जात असताना, चेन्नईमध्ये हाच दर २,६४,९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा निकाल आणि महागाईची नवी आकडेवारी समोर येत नाही, तोपर्यंत बाजारात अशीच 'धडधड' सुरू राहील. त्यामुळे जर तुम्ही मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर थोडे दिवस थांबून बाजाराचा कल पाहणं फायद्याचं ठरू शकतं.
