TRENDING:

भारतीयांसाठी लकी ठरतेय ही गुंतवणूक! सगळे मालामाल, पैसे वाढतच जातायेत

Last Updated:

या ठिकाणी थोडी हिंमत दाखवण्याऱ्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळतो. लाँग टर्मबद्दल बोलायचं झाल्यास हा सर्वाधिक परतावा देणारा पर्याय बनला आहे.

advertisement
नवी दिल्ली : लोक आपल्या बचतीतून गुंतवणूक करण्यावर भर देतात जेणेकरून चांगला परतावा मिळेल व गुंतवणूक केलेल्या रकमेत वाढ होईल. गुंतवणुकीबद्दल बोलायचं झाल्यास सध्या भारतीयांचा सर्वाधिक विश्वास म्युच्युअल फंडावर दिसत आहे. या ठिकाणी थोडी हिंमत दाखवण्याऱ्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळतो. लाँग टर्मबद्दल बोलायचं झाल्यास हा सर्वाधिक परतावा देणारा पर्याय बनला आहे. यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडाने ऑगस्टमध्ये त्यांची मजबूत गती कायम ठेवली आणि थीम आधारित योजनांच्या मजबूत योगदानामुळे यात 38,239 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
या गुंतवणुकीमुळे भारतीय मालामाल
या गुंतवणुकीमुळे भारतीय मालामाल
advertisement

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एम्फी) आकडेवारीनुसार, जुलैमध्ये 37,113 कोटी रुपयांच्या नेट फ्लोची नोंद झाली. इक्विटी फंडामध्ये सलग 42 व्या महिन्यात नेट फ्लो सुरूच आहे. कोटक महिंद्रा एएमसीचे राष्ट्रीय प्रमुख (विक्री, विपणन आणि डिजिटल व्यापार) मनीष मेहता म्हणाले, “एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) आणि एनएफओच्या (नवीन फंड ऑफरिंग)फ्लोसोबत नेट फ्लोत उत्साह आहे. एनएफओमुळे, योजनांच्या क्षेत्रीय श्रेणीमध्ये मजबूत फ्लो पाहायला मिळाला."

advertisement

काय सांगता! 11 विमान कंपन्यांनी प्रवाशांना वाटले 564 लाख रुपये; पण का? तुम्हाला मिळाले?

एनएफओमुळे नवीन पर्याय

एनएफओ म्युचुअल फंडामध्ये एकरकमी वितरण हा गुंतवणूकदारांचा आवडता ऑप्शन असल्याचे दिसत आहे. या योजनांच्या ठराविक मुदतीतील गुंतवणूकीत लवचिकता असते. एकूणच म्युचुअल फंड उद्योगात समीक्षाधीन महिन्यात 1.08 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली तर जुलैमध्ये हा आकडा 1.9 लाख कोटी रुपये होता.

advertisement

आतापर्यंत एकूण गुंतवणूक किती झाली

या गुंतवणुकीबरोबच उद्योगाच्या व्यवस्थापनाअंतर्गत निव्वळ संपत्ती ऑगस्टच्या अखेरीस वाढून 66.7 लाख कोटी रुपयांच्या ऑल टाइम हाय लेव्हलला पोहोचली. ही संपत्ती जुलैच्या अखेरीस 65 लाख कोटी रुपये होती. समीक्षाधीन महिन्यात इक्विटी स्कीम, सेक्टर किंवा थीमॅटिक फंडने सर्वांत जास्त 18,117 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली. यात जुलैमध्ये 18,386 कोटी रुपये आणि जूनमध्ये 22,352 कोटी रुपये गुंतवणूक होती.

advertisement

कॅशबॅक पडलं महागात! मोबाइल ॲपद्वारे लूट; तुमची तर होत नाहीये ना फसवणूक?

डेट फंडामध्येही झाली भरपूर गुंतवणूक

ऑगस्टमध्ये डेट फंडमध्ये गुंतवणूकदारांनी 45,169 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, जी मागच्या महिन्याच्या 1.2 लाख कोटी रुपयांपेक्षा 62 टक्के कमी आहे. याचे कारण म्हणजे आता सरकारने डेट फंडावर इंडेक्सेशनचा लाभ देणं बंद केलं आहे. पण आताही लाँग टर्मसाठी गुंतवणूकदारांचा डेट फंडांवर जास्त विश्वास आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
भारतीयांसाठी लकी ठरतेय ही गुंतवणूक! सगळे मालामाल, पैसे वाढतच जातायेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल