काय सांगता! 11 विमान कंपन्यांनी प्रवाशांना वाटले 564 लाख रुपये; पण का? तुम्हाला मिळाले?
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
जर तुम्हीही जुलै 2024 मध्ये संबंधित विमान कंपन्यांच्या विमानातून प्रवास केला असेल, तर तुम्हाला देखील हे पैसे मिळाले आहेत की नाही, हे नक्की तपासा.
नवी दिल्ली : देशांतर्गत विमान सेवा देणाऱ्या विविध कंपन्यांनी सुमारे 4 लाख 76 हजार प्रवाशांवर 564 लाख रुपये खर्च केलेत. हे पैसे प्रवाशांना नुकसान भरपाई व इतर सेवा देण्यासाठी खर्च करण्यात आलेत. जर तुम्हीही जुलै 2024 मध्ये संबंधित विमान कंपन्यांच्या विमानातून प्रवास केला असेल, तर तुम्हाला देखील हे पैसे मिळाले आहेत की नाही, हे नक्की तपासा.
देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी बोर्डिंग नाकारणे, फ्लाइट रद्द होणे, फ्लाइटला दोन तासांपेक्षा जास्त उशीर होणे, अशा समस्यांना सामोरं गेलेल्या प्रवाशांवर मोठी रक्कम खर्च केलीआहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएच्या आकडेवारीनुसार या तीन कारणांमुळे सर्वाधिक त्रास झालेले प्रवासी इंडिगोचे होते.
जुलै महिन्यात इंडिगोचे सुमारे 2,89,193 प्रवासी बोर्डिंग नाकारणे, फ्लाइट रद्द होणे किंवा फ्लाइटला उशीर होणे, अशा समस्यांना सामोरे गेलेत. यापैकी इंडिगोच्या 36 प्रवाशांना बोर्डिंग नाकारण्याचा सामना करावा लागला. तर, 1,23.588 प्रवाशांना फ्लाइट रद्द झाल्याचा फटका बसलाय. याशिवाय 2,89,193 प्रवाशांच्या फ्लाइटला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाला.
advertisement
डीजीसीएच्या आकडेवारीनुसार इंडिगोनं बोर्डिंग नाकारलेल्या 36 प्रवाशांना 3.45 लाख रुपये नुकसान भरपाई व इतर सुविधा देण्यासाठी खर्च केलेत. यानंतर एअर इंडिया कंपनीच्या सुमारे 68743 प्रवाशांना बोर्डिंग नाकारणे, फ्लाइट रद्द होणे, फ्लाइटला उशीर होण्याचा फटका बसला आहे. आकडेवारीनुसार एअर इंडियानं बोर्डिंग नाकारल्यामुळे त्रासलेल्या 822 प्रवाशांना 93.02 लाख रुपये, फ्लाइट रद्द झालेल्या प्रवाशांना 75.77 लाख रुपये आणि फ्लाइटला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झालेल्या प्रवाशांना 108.36 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिल्याचं आकडेवारीनुसार दिसून येते.
advertisement
इतर विमान कंपन्यांनी केलेला खर्च
डीजीसीएच्या जुलै महिन्यातील आकेडवारीनुसार इंडिगो व एअर इंडियाशिवाय अलायन्स एअर, एआयएक्स कनेक्ट, अकासा एअर, स्पाइस जेट, विस्तारा, फ्लाय बिग, इंडिया वन एअर, स्टार एअर आणि फ्लाई 91 या विमान कंपन्यांनी देखील नुकसान भरपाईपोटी प्रवाशांना पैसे परत दिले आहेत. यामध्ये अलायन्स एअरच्या फ्लाइट रद्द केल्याचा फटका 9948 प्रवाशांना तर फ्लाइटला दोन तासांपेक्षा उशीर झाल्याचा 5208 फटका प्रवाशांना बसला आहे. या कंपनीनं नुकसान भरपाईपोटी अनुक्रमे 4 हजार व 79 हजार रुपये खर्च केले आहेत. याशिवाय एआयएक्स कनेक्टनं फ्लाइट रद्द झालेल्या 1462 प्रवाशांना 5.96 लाख आणि फ्लाइटला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झालेल्या 17623 प्रवाशांना 68.07 लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे.
advertisement
अकासा एअरनं बोर्डिंग नाकारलेल्या 22 प्रवाशांना 1.09 लाख, फ्लाइट रद्द झालेल्या 1105 प्रवाशांना 11.47 लाख आणि फ्लाइटला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झालेल्या 20585 प्रवाशांना 51.59 लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. तर, स्पाइस जेटनं बोर्डिंग नाकारलेल्या 113 प्रवाशांना 1.27 लाख, फ्लाइट रद्द झालेल्या 11311 प्रवाशांना 9.17 लाख आणि फ्लाइटला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झालेल्या 43521 प्रवाशांना 92.73 लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे.
advertisement
याशिवाय विस्तारा कंपनीनं बोर्डिंग नाकारलेल्या 121 प्रवाशांना 13.89 लाख, फ्लाइट रद्द झालेल्या 66 प्रवाशांना 0.03 लाख आणि फ्लाइटला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झालेल्या 6061 प्रवाशांना 18.23 लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. फ्लाई बिगच्या 106 प्रवाशांना फ्लाइट रद्द झाल्याचा फटका बसलाय. तर इंडिया वन एअरच्या 143 प्रवाशांना फ्लाइट रद्द झाल्याचा फटका बसला असून त्यांना नुकसान भरपाईपोटी 4.39 लाख रुपये देण्यात आलेत. याशिवाय स्टार एअरच्या 352 प्रवाशांना फ्लाइट रद्द झाल्याचा फटका बसलाय. तर, फ्लाई91 च्या फ्लाइट रद्द झालेल्या 367 प्रवाशांना 3.76 लाख आणि फ्लाइटला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झालेल्या 136 प्रवाशांना 2.68 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
Location :
Delhi
First Published :
September 11, 2024 3:26 PM IST
मराठी बातम्या/मनी/
काय सांगता! 11 विमान कंपन्यांनी प्रवाशांना वाटले 564 लाख रुपये; पण का? तुम्हाला मिळाले?