नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी! 15 सप्टेंबरपासून धावणार तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस
- Published by:News18 Marathi
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबरला देशातील 10 वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यातील एक गाडी नागपूरहून सुटणार आहे.
नागपूर: देशाचे भौगोलिक केंद्र असणाऱ्या नागपूरसाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठं गिफ्ट दिलंय. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध रेल्वे मार्गांवर 10 वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 15 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. तर नागपूरकरांनाही या रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे.
नागपूर - सिकंदराबाद या गाडीमुळे नागपूरवरून धावणाऱ्या वंदे भारतची संख्या तीन होणार आहे. या आधी नागपूर-बिलासपूर आणि नागपूर-इंदोर या वंदेभारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. या दोन्ही गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नागपूर ते सिकंदराबाद रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी जास्त आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसची गरज होती. ही गोष्ट लक्षात घेऊन या मार्गावर मंगळवार सोडून आठवड्यातील सहा दिवस वंदे भारत ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
कसे असेल वेळापत्रक?
नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 5 वाजता नागपूरहून निघणार आहे. ती दुपारी 12:15 वाजता सिकंदराबादला पोहचणार असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे सिकंदराबाद येथून दुपारी 1 वाजता ही गाडी सुटेल आणि रात्री 8:20 वाजता नागपूरला पोहचणार आहे. ही गाडी सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम, काजीपेठला थांबणार असून या गाडीत 16 कोच असतील. 578 किलोमीटरचे अंतर ही गाडी 7:15 ते 7:20 तासात पूर्ण करेल. या गाडीचा वेग प्रती तास साधारणतः 80 किलोमीटर आणि कमाल वेग 130 किलोमीटर राहणार असल्याची माहिती आहे.
advertisement
नागपूर-पुणेबाबत काय आहे अपडेट?
गेल्या काही काळापासून नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेन चालविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. नागपूर ते पुणे हे अंतर बघता चेअर कार तिथे शक्य नाही. म्हणून स्लीपर कोच सुरू करण्याची मागणी होती. ही ट्रेन सुद्धा लवकरच सुरु करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. मात्र त्याबाबत अजूनही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनविषयी अधिक चर्चा सुरू आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
September 11, 2024 2:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी! 15 सप्टेंबरपासून धावणार तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस