TRENDING:

पेट्रोल, डिझेल समजू शकतो इराण युद्धामुळे आता बाटलीबंद पाणी महागणार, किती पैसे जास्त मोजावे लागणार?

Last Updated:

Bottled Water: वेस्ट आशियात सुरू असलेल्या इराण युद्धाचा परिणाम आता भारतातील बाटलीबंद पाण्याच्या उद्योगावरही दिसू लागला आहे. पॅकेजिंग साहित्याच्या वाढत्या किंमतींमुळे कंपन्या उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याच्या बाटल्यांचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत.

advertisement
मुंबई:  इराण युद्धाचा परिणाम आता भारतातील बाटलीबंद पाण्याच्या उद्योगावरही दिसू लागला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार सुमारे 5 अब्ज डॉलर्सच्या भारतीय पॅकेज्ड वॉटर मार्केटमध्ये उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे देशात उन्हाळ्याचा हंगाम सुरू होण्याच्या आधीच हा दबाव वाढत आहे.
News18
News18
advertisement

अहवालानुसार युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून प्लास्टिकच्या बाटल्या, झाकण, लेबल आणि कार्डबोर्ड बॉक्स यांसारख्या पॅकेजिंग साहित्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम बाटलीबंद पाणी तयार करणाऱ्या कंपन्यांच्या खर्चावर होत आहे.

ऑल इंडिया पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माहितीनुसार सुमारे 2,000 लहान उत्पादकांनी त्यांच्या वितरकांसाठी प्रति बाटली सुमारे 1 (सुमारे 5%) दरवाढ केली आहे. उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत किंमतींमध्ये सुमारे 10% पर्यंत आणखी वाढ होऊ शकते.

advertisement

सध्या किरकोळ बाजारात मात्र मोठा बदल दिसत नाही, कारण मोठ्या कंपन्या वाढलेल्या खर्चाचा काही भाग स्वतःच उचलत आहेत. साधारणपणे भारतात 1 लिटर बाटलीबंद पाण्याची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी असते.

परिणाम का दिसत आहे?

उद्योगातील प्रतिनिधींच्या मते कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पॉलिमरचे दर वाढले आहेत, जे प्लास्टिक बाटल्या बनवण्यासाठी मुख्य कच्चा माल आहे. प्लास्टिक बाटल्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची किंमत जवळपास 50% वाढून सुमारे 170 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. तर बाटल्यांच्या झाकणांची किंमतही दुप्पटपेक्षा जास्त वाढून सुमारे ₹0.45 प्रति तुकडा झाली आहे. याशिवाय कॉरुगेटेड बॉक्स, लेबल आणि चिकट टेप यांच्या किंमतींमध्येही वेगाने वाढ झाली असून त्यामुळे उत्पादन खर्च आणखी वाढत आहे.

advertisement

भारतासारख्या देशात जिथे सुमारे 70% भूजल प्रदूषित असल्याचे सांगितले जाते, तिथे स्वच्छ पाण्याची उपलब्धता मोठे आव्हान आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्यावर लोकांचे अवलंबित्व वाढत आहे.

प्रीमियम पाणीही महाग

बाटलीबंद पाण्याच्या बाजारात नैसर्गिक मिनरल वॉटरचा विभागही झपाट्याने वाढत आहे. भारतात हा व्यवसाय सुमारे 400 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षी प्रीमियम पाण्याचा हिस्सा एकूण बाजारात 8% होता, तर 2021 मध्ये तो फक्त 1% होता.

advertisement

अरावली पर्वतरांगांमधून मिळणारे मिनरल वॉटर विकणाऱ्या Aava कंपनीनेही आपल्या पुनर्विक्रेत्यांसाठी बाटल्यांच्या किंमती सुमारे 18% ने वाढवल्या आहेत. उद्योग तज्ज्ञांच्या मते अनेक कंपन्या अजूनही 40-50% अतिरिक्त खर्च स्वतः उचलत आहेत, जेणेकरून ग्राहक गमावले जाणार नाहीत. मात्र कच्च्या मालाच्या किंमती अशाच वाढत राहिल्यास येत्या काळात उन्हाळ्यात बाटलीबंद पाण्याच्या किंमती वाढल्याचे स्पष्टपणे ग्राहकांना जाणवू शकते.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
पेट्रोल, डिझेल समजू शकतो इराण युद्धामुळे आता बाटलीबंद पाणी महागणार, किती पैसे जास्त मोजावे लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल