TRENDING:

रातोरात 40 डॉलरने घसरले क्रूड ऑइल, तरीही वाढले पेट्रोल डिझेलचे दर, कारण काय?

Last Updated:

इराण-इस्रायल युद्धामुळे क्रूड ऑइलचे दर 80 डॉलर्सवर आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर दर कोसळले. तुमच्या शहरात पेट्रोलचे दर काय आहेत ते टाकी फुल्ल करण्याआधी जाणून घ्या.

advertisement
इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्ध चांगलंच पेटलं आहे. जमिनीवरच नाही तर आता समुद्रातही तणाव वाढला आहे. होर्मुज बंद असल्याने क्रूड ऑइलचे दर गगनाला पोहोचले होते. अगदी 80 डॉलर्सवरुन 120 ते 130 डॉलर्सच्या आसपास पोहोचले होते. मात्र रातोरात हेच दर आपटले आहेत. क्रूड ऑइलचे दर 80 डॉलर्सवर आल्याने जगभरात भीतीचं वातावरण आहे. असं असलं तरीसुद्ध पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये मात्र कोणताही दिलासा मिळाला नाही.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

इराण विरुद्ध इस्रायल सुरू असलेल्या युद्धाची झळ थेट खिशाला बसू लागली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानानंतर क्रूड ऑइलचे दर कोसळले. क्रूड ऑइलचा भाव 130 डॉलरकडे जाईल असं वाटत होतं, तो आता थेट 80 डॉलरच्या खाली आला. हे सगळं असलं तरीसुद्धा अजून संकट टळलेलं नाही. याचं कारण म्हणजे LPG-PNG गॅस पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे कर्मशियल गॅस पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, इराणचं प्रकरण आता संपत आलंय, त्यांच्याकडे आता लढण्यासारखं काही उरलेलं नाही. ट्रम्प यांच्या या कॉन्फिडन्समुळे बाजारातली भीती पळाली आणि तेलाचे भाव कोसळले. शिवाय, रशियाकडून तेल घेण्याचे मार्ग मोकळे करण्याचे संकेतही त्यांनी दिलेत. यामुळे पेंट, टायर आणि विमान कंपन्यांचे मालक खुश झालेत, पण सामान्य माणसाच्या पदरात काय पडलं?

advertisement

जगभरात तेल स्वस्त होत असताना आपल्याकडे काही शहरात कंपन्यांनी गुपचूप १०-२० पैसे वाढवून दिलेत. मुंबईत आजही भाव स्थिर असले तरी, इतर शहरात मात्र पेट्रोल डिझेलच्या दरात अस्थिरता आहे. काही ठिकाणी दर वाढले आहेत. लखनऊ आणि गाझियाबाद, पटना, बिहारमध्ये 20 ते 31 पैशांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्याचा थेट फटका ग्राहकांच्या खिशाला बसला आहे.

advertisement

शहर पेट्रोल दर
परभणी 105.5
रत्नागिरी 105.5
सिंधुदुर्ग 105.5
यवतमाळ 105.5
नांदेड 105.49
लातूर 105.42
सोलापूर 105.1
वाशिम 104.9
नंदुरबार 104.81
सातारा 104.76
वर्धा 104.76
कोल्हापूर 104.73
धुळे 104.62
पालघर 104.42
नाशिक 104.4
पुणे 104.22
चंद्रपूर 104.1
नागपूर 104.05
मुंबई 103.54

advertisement

सर्वात महाग पेट्रोल परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि यवतमाळमध्ये पेट्रोलचा दर सर्वाधिक १०५.५० रुपये आहे. सर्वात स्वस्त पेट्रोल राजधानी मुंबईत पेट्रोल सर्वात स्वस्त असून त्याचा दर १०३.५४ रुपये आहे. मुंबई आणि परभणीच्या दरात प्रति लीटर १.९६ रुपयांचा फरक आहे.

मराठी बातम्या/मनी/
रातोरात 40 डॉलरने घसरले क्रूड ऑइल, तरीही वाढले पेट्रोल डिझेलचे दर, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल