सेविंग्स प्रोचे फायदे
हाय रिटर्न: आता बचत खात्यावर मिळणाऱ्या कमी व्याजाऐवजी, ग्राहकांना त्यांच्या जास्तीच्या पैशांवर 6.5% पर्यंतचा वार्षिक परतावा मिळू शकेल.
वापरण्यास सोपे: ही सुविधा वापरण्यासाठी फक्त ‘JioFinance’ ॲपचा वापर करावा लागेल. काही क्लिकमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
लवकर पैसे काढण्याची सुविधा
ग्राहक या योजनेत रोज 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना 90% पर्यंतची रक्कम कधीही काढता येते. 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम लगेचच काढता येते, तर त्याहून अधिक रक्कम 1 ते 2 दिवसांत खात्यात जमा होते.
advertisement
कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही
या संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही छुपे शुल्क, प्रवेश किंवा बाहेर पडण्याचे शुल्क किंवा लॉक-इन कालावधी नाही. त्यामुळे ग्राहक आपल्या पैशांवर जास्तीत जास्त फायदा मिळवू शकतात. काही ठिकाणी अशा सेवा देताना त्यावर छुपे शुल्क आकारले जातात. मुदतीआधी पैसे काढल्यास दंडही आकारला जातो. ठराविक रक्कम कापून घेतली जाते.
जिओ पेमेंट्स बँकेचे एमडी आणि सीईओ विनोद ईश्वरन यांनी सांगितले की, सध्याच्या काळात व्याजदर कमी होत असल्यामुळे ग्राहक त्यांच्या बचतीसाठी चांगले पर्याय शोधत आहेत. सेविंग्स प्रो ही गरज पूर्ण करते आणि ग्राहकांना त्यांचे पैसे अधिक चांगल्या प्रकारे वाढवण्याची संधी देते.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (Jio Financial Services Limited) डिजिटल आर्थिक सेवांमध्ये एक आघाडीची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून कर्ज, बचत खाते, यूपीआय बिल पेमेंट्स, डिजिटल विमा आणि गुंतवणुकीशी संबंधित अनेक सेवा पुरवल्या जातात.