खरं तर सरकारने काही दिवसांपूर्वीच ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला होता. कारण अनेक एकाच कुटुंबातील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत होती. त्याचसोबत अनेक लाडक्या भावांनी देखील योजनेतून पैसे लाटले होते. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा फायदा होईल. पण या निर्णयानंतर महिला वर्गात काहीशी नाराजी होती. आता ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनेचा ई-केवायसी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलावर्गाची नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
advertisement
महायुती सरकारच्या या निर्णयाने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचसोबत भाऊबीजेच्या तोंडावर ही बातमी मिळाल्याने लाडक्या बहिणींची दिवाळी आणखी गोड झाली आहे.
दरम्यान लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरु झाली.28 जून 2024 रोजी मंजुरी मिळाल्यानंतर जुलैपासून महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यभरात अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 56 लाखांवर पोहोचली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ही योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली होती.
ई-केवायसीची प्रक्रिया:
सर्व प्रथम ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
पोर्टलवर लॉगिन करून तुमचे आधार कार्ड आणि इतर माहिती भरा.
तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल.
तो ओटीपी टाकून तुमची ओळख सत्यापित करा.