TRENDING:

सर्वात स्वस्त Gold Loan कुठे मिळतं? पाहा कोणती बँक-एनबीएफसी देतेय आकर्षक ऑफर 

Last Updated:

भारतात गोर्ड लोन हे गरजेच्या वेळी खुप मदत करते. अनेक प्रमुख बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) प्रतिस्पर्धी व्याजदरांवर गोल्ड लोन प्रदान करत आहेत.

advertisement
मुंबई : सोन्याच्या भाव सध्या गगणाला भिडले आहेत. यासोबतच महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खर्चाचं ओझंही वाढतंय. अशावेळी गोल्ड लोन सर्वात वेगवान आणि सहज मिळणारा ऑप्शन आहे. सोने गहाण ठेवून मिळणारे लोन कोणत्याही क्रेडिट चेक शिवाय काही तासांत उपलब्ध होते. याचे व्याजदरही इतर लोनपेक्षा खुप कमी असते.
गोल्ड लोन इंट्रेस्ट रेट्स
गोल्ड लोन इंट्रेस्ट रेट्स
advertisement

मार्च 2026 मध्ये अनेक बँका आणि NBFC आकर्षक ऑफर देत आहे. येथे व्याजदर 8.25% ते 9% वार्षिकपर्यंत सुरु होत आहेत. कोणता लेंडर (बँक किंवा एनबीएफसी) तुमच्यासाठी सर्वात स्वस्त आणि सुविधाजनक ठरेल? चला सविस्तर जाणून घेऊया टॉप ऑफर्स, प्रोसेसिंग फीस, LTV रेशियो आणि तुलना जेणेकरुन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत होईल आणि कमी व्याजात तुम्हाला जास्त रक्कम मिळू शकेल.

advertisement

प्रमुख बँकांद्वारे गोल्ड लोनवर किती व्याज दिले जातेय पाहूया...

स्टेट बँक ऑफ इंडिया 

एसबीाय गोल्ड लोनची सुरुवात 9% वार्षिक व्याजदराने करते. या योजनेअंतर्गत ग्राहक 20,000 पासून तर 50 लाख रुपयांपर्यंत लोन घेऊ शकता. ईएमआय आधारिकत ऑप्शनमध्ये लोनचा जास्तीत जास्त कालावधी 3 वर्षांपर्यंत असू शकते. तसंच बुलेट रिपेमेंट ऑप्शनमध्ये 3 महिने, 6 महिने आणि 12 महिन्याच्या कालावधीचा ऑप्शन दिला जातो.

advertisement

सर्व पैसे एकाच बँक अकाउंटमध्ये ठेवत असाल तर सावधान! येऊ शकता अडचणीत, पण का?

पंजाब नॅशनल बँक 

पंजाब नॅशनल बँक 9.25% वार्षिक व्याजदराने गोल्ड लोन उपलब्ध करुन देते. यामध्ये ग्राहक जास्तीत जास्त 25 लाख रुपयांपर्यंत लोन घेऊ शकता. याचा कालावधी एक वर्षांपर्यंत ठरवण्यात आला आहे. पैसे भरण्यासाठी ग्राहकांना बुलेट रिपेमेंट, EMI आणि ओव्हरड्राफ्टसारखे ऑप्शन मिळतात.

advertisement

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेत सोन्याच्या कर्जासाठी रेट ऑफ रिटर्न (IRR) दरवर्षी 9.10% ते 19% पर्यंत असतो. कर्जे 25,000 रुपयांपासून सुरू होतात आणि 6 ते 42 महिन्यांपर्यंत असू शकतात. बँक सोन्याच्या बाजार मूल्याच्या कमाल 75% पर्यंत कर्ज देते.

आयसीआयसीआय बँक 

आयसीआयसीआय बँक गोल्ड लोनवर 8.75% ते 16.75% वार्षिकपर्यंत व्याजदर आकारते (2025 च्या अखेरीस). कर्जाचा कालावधी 6 ते 36 महिन्यांपर्यंत असतो. पात्रता निकष पूर्ण केल्यास ग्राहक 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देखील घेऊ शकतात.

advertisement

बँक ऑफ इंडिया 

बँक ऑफ इंडिया 8.85% वार्षिकपासून गोल्ड लोनची सुविधा देते. यामध्ये ग्राहक जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत लोन घेऊ शकतात. लोनचा कालावधी काही महिन्यांपासून तर 36 महिन्यांपर्यंत असू शकते. बँक सोन्याच्या बाजार मूल्याच्या जास्तीत जास्त 85% पर्यंत लोन सुविधा देखील देते.

इराण इस्रायल युद्धाचा भडका तुमच्या घरापर्यंत! खाद्यतेलासह सुकामेवा, खजुर महागले

NBFC कंपन्यांचे गोल्ड लोनचे व्याजदर 

मुथूट फायनेंस 

मुथूट फायनेंस 10.90% वार्षितपासून गोल्ड लोन उपलब्ध करते. येथे ग्राहक जास्तीत जास्त 1 कोटीपर्यंत लोन घेऊ शकतात आणि याचा कालावधी एक वर्षांपर्यंत असतो. लोन घेण्यासाठी 22 ते 24 कॅरेट सोन्याची ज्वेलरी किंवा नाणे गहाण ठेवावे लागतात.

मणप्पुरम फायनान्स

मणप्पुरम फायनान्स वार्षिक 9.90% व्याजदराने गोल्ड लोन देते. ग्राहकांना जास्तीत जास्त 1.5 कोटी रुपयांचे कर्ज मिळू शकते आणि त्याचा कालावधी एक वर्षापर्यंत आहे. कंपनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या 75% पर्यंत कर्ज देते.

बजाज फिनसर्व्ह 

बजाच फिनसर्व्ह गोल्ड लोन 9.5% ते 24% वार्षिक व्याजदरा दरम्यान उपलब्ध करुन देते. या अंतर्गत ग्राहक जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांपर्यंत लोन घेऊ शकतात. या लोनसाठी 22 ते 24 कॅरेट गोल्ड ज्वेलरी तारण ठेवावी लागते.

मराठी बातम्या/मनी/
सर्वात स्वस्त Gold Loan कुठे मिळतं? पाहा कोणती बँक-एनबीएफसी देतेय आकर्षक ऑफर 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल