कुठे बंद असतील बँक
'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट' अंतर्गत महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने 22 शहरांमधील सर्व सरकारी आणि खाजगी बँका बंद राहतील. अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम या शहरांमध्ये आज बँका बंद राहतील. त्यामुळे तुम्ही जर बँकेत जाणार असाल तर तुमचं काम आज बँक बंद असल्याने होणार नाही.
advertisement
कुठे सुरू राहतील बँक सेवा?
महाशिवरात्री ही राष्ट्रीय सुट्टी नसल्याने काही राज्यांमध्ये बँका सुरू राहतील. त्रिपुरा, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, बंगाल, नवी दिल्ली, गोवा, बिहार आणि मेघालय या राज्यांमध्ये ग्राहकांना नेहमीप्रमाणे बँक सेवा सुरू राहणार आहेत.
शाळा, महाविद्यालये आणि काही कार्यालयेही बंद
महाशिवरात्रीनिमित्त अनेक ठळक घडामोडी घडणार आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि काही खाजगी कार्यालयेही बंद राहतील.
शेअर मार्केटची काय स्थिती?
महाशिवरात्रीनिमित्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वरील सर्व प्रकारचे व्यवहार आज बंद राहणार आहेत. म्हणजेच, आज शेअर बाजारातही कोणताही व्यवहार होणार नाही. याशिवाय, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज विभागातील व्यवहारही आज बंद राहणार आहेत.
कमोडिटी बाजारात संध्याकाळी व्यवहार सुरू
कमोडिटी बाजार आज सकाळच्या सत्रात बंद राहील. परंतु, संध्याकाळी ५ वाजल्यापासून कमोडिटी बाजारात पुन्हा व्यवहार सुरू होतील.
महाशिवरात्रीनिमित्त बँकिंग सेवा आणि इतर व्यवहारांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने, ग्राहकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या स्थानिक बँकेत संपर्क साधून माहिती घेणे फायद्याचं ठरेल. शिवाय छोट्या कामांसाठी ATM आणि ऑनलाईन बँकिंग सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कामं ऑनलाईन बँकिंगद्वारे करू शकता.