E-KYC करण्यामागे हा उद्देश
'माझी लाडकी बहीण' ही योजना राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच मिळावा आणि आर्थिक मदतीच्या वितरणात कोणतीही अनियमितता राहू नये, यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ई-केवायसीमुळे लाभार्थी भगिनींची ओळख आणि बँक खाते तपशील अधिकृतपणे आणि सुरक्षितपणे सत्यापित होतात, ज्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत संपूर्ण पारदर्शकता येते. या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात ठराविक वेळेत आणि नियमितपणे निधी जमा करणे सरकारला शक्य होणार आहे.
advertisement
E-KYC कुठे करायचं
योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही ई-केवायसी सुविधा १८ सप्टेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. ई-केवायसीची सुविधा https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकूण दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेत अनेक अडचणी येत आहेत. मात्र लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. ज्यांनी केलं नाही त्यांना ही शेवटची संधी असेल.
ही शेवटची तारीख
ज्या लाभार्थी लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी सरकारने अंतिम मुदत निश्चित केली आहे. १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. नाहीतर त्यांचं नाव या यादीमधून कायमस्वरुपी वगळण्यात येणार आहे. योजनेतील उर्वरित लाभार्थी भगिनींनी कोणत्याही अडचणींची वाट न पाहता, लवकरात लवकर आणि विहित मुदतीच्या आत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश प्रत्येक पात्र भगिनीला आर्थिक आधार देणे हा आहे. त्यामुळे ही ई-केवायसीची प्रक्रिया लाभार्थ्यांच्या हिताची असून, ही सुविधा वेळेत पूर्ण केल्यास भविष्यात मिळणाऱ्या आर्थिक लाभाची वाट पाहावी लागणार नाही, याची नोंद घ्यावी. सर्व भगिनींनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी, जेणेकरून योजनेचा लाभ सुरळीतपणे सुरू राहील.
