डीमर्जरनंतर बेस मेटल व्यवसाय वेदांता लिमिटेडकडेच राहणार आहे. याशिवाय चार स्वतंत्र कंपन्या तयार केल्या जाणार आहेत. वेदांता अॅल्युमिनियम, तलवंडी साबो पॉवर, वेदांता स्टील अँड आयर्न आणि माल्को एनर्जी. या सर्व कंपन्यांची स्वतंत्रपणे शेअर बाजारात लिस्टिंग केली जाईल.
अनिल अग्रवाल यांच्या मते या पाच कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅपिटलायझेशन सध्याच्या सुमारे 27 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणाखालील एक खासगी होल्डिंग कंपनी प्रत्येक नव्या कंपनीत जवळपास 50% हिस्सा ठेवणार आहे.
advertisement
यापूर्वी कंपनीने सहा कंपन्यांमध्ये विभाजनाचा आराखडा मांडला होता ज्यामध्ये ऑइल अँड गॅस आणि बेस मेटल्स वेगळे करण्याचा विचार होता. मात्र नंतर बदल करत बेस मेटल व्यवसाय मूळ कंपनीतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. डीमर्जरनंतर विद्यमान शेअरधारकांना नव्याने लिस्ट होणाऱ्या सर्व कंपन्यांचे शेअर्स दिले जाणार आहेत. म्हणजेच एका शेअरच्या बदल्यात गुंतवणूकदारांना अनेक कंपन्यांमध्ये हिस्सा मिळू शकतो.
वेदांता डीमर्जरचा प्लॅन सर्वप्रथम 2023 मध्ये समोर आला होता. सुरुवातीला सरकारने या योजनेला विरोध दर्शवला होता, कारण या विभाजनामुळे कंपनीकडून थकबाकी वसुलीवर परिणाम होऊ शकतो अशी भीती होती. मात्र आता सर्व प्रक्रिया पूर्णत्वाकडे जात असून कंपनी मे महिन्याच्या मध्यापर्यंत नव्या कंपन्यांची लिस्टिंग करण्याच्या तयारीत आहे.
वेदांता समूहाचा व्यवसाय भारतासह दक्षिण आफ्रिका, नामिबिया, लायबेरिया, यूएई, सौदी अरेबिया, कोरिया, तैवान आणि जपानमध्ये पसरलेला आहे. कंपनी तेल आणि गॅस, जस्त, शिसे, चांदी, तांबे, स्टील आणि अॅल्युमिनियम यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे.
शेअर बाजाराच्या दृष्टीने पाहता कंपनीचा सध्याचा शेअर भाव बीएसईवर सुमारे 658.55 रुपये आहे. कंपनीने अलीकडेच 11 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला होता ज्यासाठी 27 मार्च ही रेकॉर्ड डेट होती. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 45% वाढ झाली आहे.
डीमर्जरनंतर प्रत्येक कंपनी आपल्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करू शकेल ज्यामुळे वाढ वेगाने होण्यास मदत होईल असे कंपनीचे मत आहे. तसेच कर्ज कमी करण्यास आणि गुंतवणूकदारांना अधिक चांगला परतावा देण्यासही हा निर्णय फायदेशीर ठरेल. गुंतवणूकदार सध्या या डीमर्जर प्रक्रियेवर आणि नव्या कंपन्यांच्या लिस्टिंगकडे लक्ष ठेवून आहेत.
