TRENDING:

सहारा घोटाळ्यात तुमचे पैसे अडकले आहेत का? 5 मिनिटांत तपासा स्टेटस; रक्कम काढण्याची मुदत वाढवली, पोर्टल सुरू

Last Updated:

Sahara Group Refund Check: सहारा इंडिया ग्रुपच्या 1.74 लाख कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने रिफंड प्रक्रिया आता डिजिटल आणि सोपी केली आहे.

advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) सहारा इंडिया ग्रुप, त्याचे संस्थापक सुब्रतो रॉय यांचे कुटुंबीय आणि उच्च अधिकाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित या प्रकरणात ईडीने शनिवारी (2 सप्टेंबर) कोलकात्याच्या पीएमएलए (PMLA) न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. या तपासामध्ये असे समोर आले आहे की, सहारा ग्रुपने उच्च परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी गुंतवणूकदारांकडून सुमारे 1.74 लाख कोटी रुपयांची मोठी रक्कम जमा केली.

advertisement

सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी दिलासा

जर तुमचेही पैसे सहारा ग्रुपमध्ये अडकले असतील तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे. केंद्र सरकारने सहारा रिफंड सिस्टीम पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक बनवली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना आता वारंवार कार्यालयात जाण्याची गरज नाही. तर घरी बसूनच ऑनलाइन रिफंडची स्थिती तपासता येते. यासाठी सरकारने mocrefund.crcs.gov.in हे विशेष पोर्टल सुरू केले आहे.

advertisement

रिफंड स्टेटस तपासण्याची प्रक्रिया

mocrefund.crcs.gov.in या पोर्टलवर जा.

'Depositor Login' वर क्लिक करा.

तुमचा आधार क्रमांक किंवा सहारा पावती क्रमांक (Sahara receipt number) टाका.

नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करा.

advertisement

स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या रिफंडची स्थिती दिसेल.

जर तुमच्या अर्जातील कोणत्याही माहितीमध्ये काही चूक असेल, तर पोर्टलवरच अर्ज फॉर्म अपडेट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यासोबतच पैसे देण्याचा प्रकार (जसे की बँक ट्रान्सफर किंवा NEFT) देखील तुम्ही ऑनलाइन पाहू शकता.

advertisement

-रिफंडची मर्यादा वाढली

-यापूर्वी जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत रिफंड मिळत होता.

-आता सरकारने ही मर्यादा वाढवून 50,000 रुपये केली आहे. यामुळे लहान गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.

रिफंडची अंतिम मुदत 2025

सरकारने रिफंडसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. तुमचे नाव सर्व कागदपत्रे आणि सहाराच्या पावतीवर एकसारखे असावे, याची नोंद घ्या.

मराठी बातम्या/मनी/
सहारा घोटाळ्यात तुमचे पैसे अडकले आहेत का? 5 मिनिटांत तपासा स्टेटस; रक्कम काढण्याची मुदत वाढवली, पोर्टल सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल