TRENDING:

गुंतवणूकदार वेडे झाले, Share Marketमध्ये 1 लाखाचे झाले 23 लाख; एका शेअरची किंमत अजूनही ३००च्या खाली

Last Updated:

Multibagger Stock: फक्त 4 वर्षांत डिफेन्स सेक्टरमधील अपोलो मायक्रो सिस्टम्स या कंपनीच्या शेअरने अविश्वसनीय झेप घेतली आहे. 1 लाख रुपयांचं गुंतवणूक आज तब्बल 23 लाखांवर पोहोचलं आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : डिफेन्स कंपनी अपोलो मायक्रो सिस्टिम्स (Apollo Micro Systems) च्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना असा जबरदस्त परतावा दिला आहे की, याला शेअर न म्हणता थेट कुबेराचा खजिना म्हणणे जास्त योग्य ठरेल. मागील 4 वर्षांत कंपनीच्या शेअर किमतींमध्ये तब्बल 2300 टक्क्यांची प्रचंड उसळी पाहायला मिळाली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 4 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती. तर आज त्याची किंमत सुमारे 23 लाख रुपयांवर पोहोचली असती.

advertisement

चार वर्षांपूर्वी 27 ऑगस्ट 2021 रोजी या कंपनीचा शेअर केवळ 11.52 रुपयांवर होता. तर 29 ऑगस्ट 2025 रोजी हा शेअर 271.60 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच जर एखाद्याने 2021 मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज त्याची गुंतवणूक 23.57 लाख रुपयांहून अधिक झाली असती.

advertisement

8,048 कोटी रुपये मार्केट कॅप

शुक्रवारी (29 ऑगस्ट) अपोलो मायक्रो सिस्टिम्सचा शेअर बीएसईवर 8.29 टक्क्यांच्या वाढीसह 262.60 रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान हा शेअर तब्बल 12 टक्क्यांनी वाढून 271.60 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 271.60 रुपये आणि नीचांक 88.10 रुपये असा आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 8,048 कोटी रुपये आहे.

advertisement

शेअर प्राइस हिस्ट्री

अपोलो मायक्रो सिस्टिम्सच्या शेअर्सच्या कामगिरीकडे पाहिले तर या शेअरने मागील एका आठवड्यात 11.65 टक्के परतावा दिला आहे. एका महिन्यात या शेअरमध्ये 47.74 टक्क्यांची उसळी आली आहे. मागील सहा महिन्यांत हा शेअर 39.09 टक्क्यांनी उचलला आहे. यावर्षी आतापर्यंत (2025 मध्ये) या शेअरने 127.56 टक्के मजबुती दाखवली आहे. मागील एका वर्षात या शेअरने तब्बल 148.91 टक्के परतावा दिला आहे. तर मागील 3 वर्षांत या डिफेन्स शेअरने तब्बल 1,626.50 टक्क्यांची उसळी नोंदवली आहे.

advertisement

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
गुंतवणूकदार वेडे झाले, Share Marketमध्ये 1 लाखाचे झाले 23 लाख; एका शेअरची किंमत अजूनही ३००च्या खाली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल