TRENDING:

आई शिवणकाम करायची, लेकीनं त्यातच केलं करिअर, आता 3 फॅक्ट्री अन् नावाजलेला ब्रँड!

Last Updated:

Fashion Design: मुंबईकर विनया विचारे हिनं एका शिलाई मशिनपासून सुरू केलेल्या व्यवसायातून मोठी झेप घेतलीये.  फॅशन डिझाईनमध्ये करिअर करत तिनं स्वत:चा ब्रँड विकसीत केलाय.

advertisement
मुंबई: एका छोट्या शिलाई मशीनवर सुरू झालेला प्रवास, आज तीन फॅक्टरींपर्यंत पोहोचला आहे. हातात कौशल्य, डोळ्यांत स्वप्ने आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असला की कोणतीही महिला स्वतःच अस्तित्व घडवू शकते, हे मुंबईकर विनया विचारेने सिद्ध करून दाखवलं आहे. विनयाने फॅशन डिझाईनची आवड आणि आईकडून मिळालेल्या प्रेरणेने आपल्या घरातूनच ‘सई डिझाईन्स’ची मुहूर्तमेढ रोवली. एका साध्या मशीनपासून सुरू झालेली ही कहाणी आज अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. स्वतःला घडवतानाच इतर महिलांना रोजगाराची संधी देणाऱ्या विनयाने आपला व्यवसाय एका कुटुंबासारखा फुलवला आहे. तिचा हा प्रवास केवळ व्यवसाय उभारण्याचा नाही, तर महिला सशक्तीकरणाचा, स्वप्न पूर्ण करण्याचा आणि परंपरा जपत नवनिर्मितीचा आहे.
advertisement

दहिसर पूर्व मधील अशोकवन येथील सई डिझाईन्स इथे फक्त 600 रुपयांपासून नऊवारी साडी शिवून मिळते. तसंच साड्यांपासून ड्रेसेस आणि हव्या त्या स्टाईलचे कपडे शिवून मिळतात. विनया विचारे यांनी आपल्या कर्तृत्वाने हा व्यवसाय वाढवला आहे.  विनयाची आई शिवणकाम शिकवायची. त्याचवेळी विनयानेही आईकडून ही कला आत्मसात केली आणि पुढे फॅशन डिझाईनचा कोर्स पूर्ण करून घरूनच कपडे शिवण्यास सुरुवात केली. आपल्या हटके स्टाईल आणि परंपरागत डिझाइन्समुळे विनयाच्या ‘सई डिझाईन्स’ला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळाली. आज ती केवळ मुंबई-पुण्यातच नव्हे, तर परदेशातही आपली उत्पादने पाठवत आहे.

advertisement

ती कचऱ्यातलं अन्न खाऊन जगत होती, तिने एक शब्द उचारला अन् लेकीची भेट झाली, सिनेमाला लाजवेल अशी स्टोरी!

महिला सशक्तीकरणाला चालना

विनयाच्या फॅक्टरीत विशेषतः महिलांना रोजगार दिला जातो. इथे काम करणाऱ्या प्रत्येकीचे ‘सई डिझाईन्स’ सोबत एक वेगळे आणि भावनिक नाते आहे. 51 वर्षांच्या माधुरी राणे यांनी स्वतःचा छंद जोपासण्यासाठी विनयाकडे यायचं ठरवलं. त्यांची कामाची ऊर्जा आणि उत्साह पाहून विनयाने त्यांना फॅक्टरीत काम करण्याची संधी दिली. विनया नेहमी म्हणते की, "प्रत्येक स्त्रीला तिची आवड जोपासता यावी, तिच्या हाताला काम मिळावे आणि त्यातून तिला समाधान व आर्थिक स्थैर्य लाभावे," यासाठी ती प्रयत्नशील असते. तिच्यासोबत काम करणाऱ्या 15 महिलांना हे जाणवते आणि त्या या प्रवासाचा भाग होताना भावूक होतात.

advertisement

महिन्याची कमाई 2 लाख

आज विनया एका यशस्वी उद्योजिकेच्या रूपात ओळखली जाते. तिच्या मेहनतीच्या जोरावर ती महिन्याला 2 लाखांहून अधिक उत्पन्न कमावते. महिला सशक्तीकरणाचा एक उत्तम आदर्श ठरत, विनयाने आपल्या जिद्द, मेहनत आणि कल्पकतेच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. विनया सांगते की, तिच्या यशामागे पती आणि सासरच्या मंडळींचा मोठा वाटा आहे. ती फॅक्टरीच्या कामात व्यस्त असताना तिच्या मुलीची काळजी संपूर्ण कुटुंबाने घेतली. त्यामुळे ती आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकली.

advertisement

आता ऑनलाईनही उपलब्ध

‘सई डिझाईन्स’चे मुख्य दुकान दहिसरमधील अशोकवन येथे आहे. याशिवाय, विनया सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ऑर्डर्स स्वीकारते. त्यामुळे देश-विदेशातील ग्राहकांसाठीही तिच्या डिझाईन्स सहज उपलब्ध होत आहेत. ‘साज परंपरेचा, विश्वास वर्षानुवर्षाचा’ या संकल्पनेवर काम करणारी विनया केवळ एक यशस्वी उद्योजिका नाही, तर अनेक महिलांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.

मराठी बातम्या/मनी/
आई शिवणकाम करायची, लेकीनं त्यातच केलं करिअर, आता 3 फॅक्ट्री अन् नावाजलेला ब्रँड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल