मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यात मात्र दर फारसे कमी झालेले दिसत नाहीत. एक तोळे सोन्यासाठी 1 लाख 16 हजार 600 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदी प्रति किलोसाठी 1,39,900 रुपये मोजावे लागणार आहेत. उत्तर भारतात चांदीचे दर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात मात्र चांदीचे दर 300 रुपयांनी वधारले आहेत. 25 सप्टेंबर रोजी आज सोने आणि चांदीची किंमत जाणून घ्या.
advertisement
किंचित घसरण झाली असली तरीसुद्धा सोन्याचे दर उच्च पातळीवरच आहेत. 1 लाख 16 हजार रुपये प्रति तोळा सोनं आहे. हे दरही सर्वोच्च मानले जात आहेत. आतापर्यंत सोन्याच्या दरांनी 40 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत. दिवाळीपर्यंत सोनं 10 हजार रुपयांनी वाढू शकतं तर वर्षाअखेरपर्यंत 1 लाख 50 हजार रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वर्षाच्या अखेरीस यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करू शकेल. कमी व्याजदरांमुळे डॉलर आणि बाँड कमकुवत होतात आणि गुंतवणूकदार सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित आश्रयस्थानांकडे वळतात. याव्यतिरिक्त, मोठे गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँका सातत्याने सोने खरेदी करत आहेत आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) देखील स्थिर आवक पाहत आहेत. या सर्वांमुळे सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे, त्यामुळे सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचे दर 1,16,650 प्रति तोळा
23 कॅरेट सोन्याचे दर 1,11,750 प्रति तोळा
22 कॅरेट सोन्याचे दर 106938 प्रति तोळा
20 कॅरेट सोन्याचे दर 97214 प्रति तोळा
18 कॅरेट सोन्याचे दर 87494 प्रति तोळा
14 कॅरेट सोन्याचे दर 68052 प्रति तोळा