TRENDING:

दसऱ्याला 150000 रुपयांवर जाणार चांदी, सोन्याच्या दरांची काय स्थिती; कमी झाले की स्वस्त?

Last Updated:

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे दर दिल्ली, मुंबई, जयपूरसह देशभरात वाढले असून, सोन्याचा दर 1,15,000 आणि चांदी 1,44,000 रुपयांवर पोहोचली आहे.

advertisement
सोन्या चांदीचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. विकेण्डला दोन दिवस सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली. त्यानंतर मात्र पुन्हा दरवाढ झाली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देशात सोने-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा झेप घेतली आहे. 29 सप्टेंबर 2025 रोजी सोन्याचा दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 500 रुपयांनी महागला असून, डिसेंबर फ्युचर्समध्ये सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1,15,500 रुपयांचा टप्पा ओलांडला. चांदीचे दर 1,44,000 रुपयांचा आकडा पार केला असून ती लवकरच 1,50,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
 आजचा सोने चांदीचा भाव
आजचा सोने चांदीचा भाव
advertisement

नवरात्रीपूर्वी मागणीत उसळी

भारतात पारंपरिकरित्या नवरात्रीत सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सणाच्या दिवसांची चाहूल लागल्याने देशभरात सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ होत आहे. दिल्ली, लखनऊ, जयपूर, नोएडा, गाझियाबाद यांसारख्या शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर सध्या 1,15,000 रुपयांच्या आसपास व्यवहारात आहे.

जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम

या वाढीमागे फक्त देशांतर्गत मागणी नाही तर जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरच्या मूल्यातील चढउतार आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या किमतींमध्ये वाढीचा कल पुढील काही दिवस कायम राहू शकतो, तर सोन्यात किरकोळ चढ-उतार दिसून येण्याची शक्यता आहे.

advertisement

नोएडा: 24 कॅरेट – 1,15,620 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 1,05,990 रुपये 10 ग्रॅम

लखनऊ: 24 कॅरेट – 1,15,620 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 1,05,990 रुपये /10 ग्रॅम

जयपूर: 24 कॅरेट – 1,15,620 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 1,05,990 रुपये 10 ग्रॅम

भुवनेश्वर: 24 कॅरेट – 1,15,470 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 1,05,840 रुपये 10 ग्रॅम

advertisement

मुंबई: 24 कॅरेट – 1,15,470 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 1,05,840 रुपये 10 ग्रॅम

कोलकाता: 24 कॅरेट – 1,15,470 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 1,05,840 रुपये 10 ग्रॅम

इंडियान बुलियन असोसिएशनच्या मते मुंबईतील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचे दर 1, 19,145 रुपये प्रति 10 ग्रॅम

23 कॅरेट सोन्याचे दर 1,14, 218 रुपये प्रति 10 ग्रॅम

advertisement

22 कॅरेट सोन्याचे दर 1,09, 280 रुपये प्रति 10 ग्रॅम

20 कॅरेट सोन्याचे दर 99,355 रुपये प्रति 10 ग्रॅम

18 कॅरेट सोन्याचे दर 89,424 रुपये प्रति 10 ग्रॅम

14 कॅरेट सोन्याचे दर 69557 रुपये प्रति 10 ग्रॅम

गुंतवणूकदारांसाठी संकेत

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या वाढत्या ट्रेंडनंतरही सोने हे दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम राहील. चांदीत मात्र वाढीचा कल आणखी काही काळ टिकून राहू शकतो. त्यामुळे सणासुदीच्या हंगामात गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी हे दिवस निर्णायक ठरू शकतात. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि देशातील वाढती मागणी यामुळे हा कल पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर वर्षाअखेरीस 1 लाख 30 हजारपर्यंत जाऊ शकतात. तर चांदीचे दर दसऱ्यापर्यंत 1 लाख 50 हजार रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
दसऱ्याला 150000 रुपयांवर जाणार चांदी, सोन्याच्या दरांची काय स्थिती; कमी झाले की स्वस्त?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल