TRENDING:

Market Shock: शेअर मार्केटचा नाद लय डेंजर, फक्त 12 तास 30 मिनिटात उडाले 11 हजार 500 कोटी; नव्या वर्षात पहिलाच धक्का

Last Updated:

Share Market: सरकारच्या सिगारेटवरील नव्या एक्साइज ड्युटीमुळे ITC च्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली असून LIC सह सरकारी विमा कंपन्यांच्या गुंतवणुकीला मोठा धक्का बसला आहे. केवळ दोन दिवसांत ITC 14 टक्क्यांहून अधिक कोसळल्याने हजारो कोटींचे आभासी नुकसान झाले आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी (LIC) ला आज आपल्या गुंतवणुकीवर मोठा धक्का बसला आहे. सरकारकडून सिगारेटवर नव्याने लावण्यात आलेल्या एक्साइज ड्युटीमुळे ITC लिमिटेडच्या शेअर्समध्ये सलग दोन ट्रेडिंग सत्रांत मोठी घसरण पाहायला मिळाली. एलआयसीने आयटीसीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याने या घसरणीचा थेट परिणाम एलआयसीच्या पोर्टफोलिओवर झाला आहे.

advertisement

मोठ्या प्रमाणातील विक्रीमुळे एलआयसीच्या गुंतवणुकीच्या बाजारमूल्यात लक्षणीय घट झाली आहे. 2 जानेवारी रोजी ITC चे शेअर्स जवळपास 5 टक्क्यांनी घसरून 345.25 या नव्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते, जरी नंतर काही प्रमाणात तोटा भरून निघाला असला तरीही नुकसान मोठेच राहिले. नवीन वर्ष 2026 मधील केवळ दोन ट्रेडिंग सत्रांत ITC चा शेअर 14 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

advertisement

गुंतवणूकदारांवर किती परिणाम झाला?

वित्तीय वर्ष 2026 च्या जुलैसप्टेंबर तिमाहीअखेरच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ITC मध्ये 100 टक्के हिस्सेदारी सार्वजनिक भागधारकांकडे आहे. विशेष म्हणजे, कंपनीत कोणताही प्रमोटर किंवा प्रमोटर गट नाही.

या कालावधीत एलआयसीकडे ITC मधील 15.86 टक्के हिस्सेदारी होती. त्याचप्रमाणे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC) कडे 1.73 टक्के, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी कडे 1.4 टक्के हिस्सेदारी होती.

advertisement

ITC च्या शेअर्समध्ये झालेल्या या तीव्र घसरणीमुळे एलआयसीच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य तब्बल 11,468 कोटींहून अधिक घटले आहे. नीचांकी पातळीवर एलआयसीच्या ITC मधील हिस्सेदारीचे मूल्य 68,560 कोटींवर घसरले, जे 31 डिसेंबरच्या क्लोजिंग लेव्हलवर 80,028 कोटी होते.

advertisement

शेअर बाजार, म्युच्युअल फंड Taxवर मोठी घोषणा होणार; सरकारकडून तयारी सुरू

याचप्रमाणे GIC ला सुमारे 1,254 कोटींचा, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सला सुमारे 1,018 कोटींचा तोटा झाला आहे. केवळ दोन दिवसांत या तीन सरकारी विमा कंपन्यांच्या पोर्टफोलिओमधून एकूण 13,740 कोटींची बाजारमूल्याची घसरण झाली आहे.

हा तोटा प्रत्यक्ष आहे का?

महत्त्वाची बाब म्हणजे, हे सर्व नुकसान ‘आभासी’ (notional) आहे, म्हणजेच ते फक्त बाजारमूल्यावर आधारित गणिती नुकसान आहे. जोपर्यंत या विमा कंपन्या सध्याच्या बाजारभावावर शेअर्स विकत नाहीत, तोपर्यंत प्रत्यक्ष नुकसान होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

शेअरचा एकूण कामगिरीचा आढावा

2 जानेवारी रोजी ITC चा शेअर अखेरीस सुमारे 4 टक्क्यांच्या घसरणीसह 350 वर बंद झाला. मागील 5 दिवसांत शेअर 13 टक्क्यांहून अधिक, तर मागील 6 महिन्यांत 15 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

12 रुपयांची Cigarette 72ला नाही तर कितीला मिळणार? संपूर्ण गणित समजून घ्या

या घसरणीचा परिणाम कंपनीच्या बाजार भांडवलावरही झाला असून, फक्त दोन दिवसांत ITC चे मार्केट कॅप सुमारे 72,000 कोटींनी कमी झाले आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 4,38,639 कोटी इतके राहिले आहे.

दरम्यान एलआयसीचा शेअर सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह 861 वर तर GIC चा शेअर किरकोळ वाढीसह 380 वर बंद झाला आहे.

मराठी बातम्या/मनी/
Market Shock: शेअर मार्केटचा नाद लय डेंजर, फक्त 12 तास 30 मिनिटात उडाले 11 हजार 500 कोटी; नव्या वर्षात पहिलाच धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल