TRENDING:

सोशल मीडियावरून घेतली माहिती, नोकरी सोडून उभारला बिस्किट व्यवसाय, महिन्याला 2 लाख रुपयांची उलाढाल

Last Updated:

उच्चशिक्षित पल्लवी वाले यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. त्या सेंद्रिय गुळाचा आणि तुपाचा वापर करून बिस्किटांच्या व्यवसायातून महिन्याला 2 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.

advertisement
सोलापूर : सोलापूर शहरातील विजापूर रोडवर राहणाऱ्या उच्चशिक्षित पल्लवी वाले यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. त्या सेंद्रिय गुळाचा आणि तुपाचा वापर करून बिस्किटांच्या व्यवसायातून महिन्याला 2 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. घरच्या जबाबदाऱ्या आणि मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला आणि गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी गहू, ज्वारी, नाचणी यापासून आरोग्यदायी बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.
advertisement

सोशल मीडिया घेतली माहिती

सोलापूर विजयपूर महामार्गावरील विजापूर रोड येथे राहणाऱ्या पल्लवी यांनी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून माहिती गोळा करून सेंद्रिय गूळ आणि तुपाचा वापर करून बिस्किटे तयार करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे सहा-आठ महिने विक्री आणि मार्केटिंगसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. यासाठी त्यांना सुरुवातीला 1 लाख रुपये खर्च आला. 

advertisement

आता ही बिस्किटे सोलापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, धाराशिव, कर्नाटकातील विजयपूर आणि हैदराबादपर्यंत पोहोचली आहेत. गहू, ज्वारी आणि नाचणीपासून बनवलेली ही बिस्किटे सहा-आठ महिने टिकतात आणि एका पाकिटाची किंमत 100 रुपयांपासून सुरू होते.

तसेच ग्राहक यांच्या घरापर्यंत येऊन बिस्किटांची खरेदी करतात. घरबसल्या लहानसा सुरू केलेला हा व्यवसाय आज वटवृक्षासारखा मोठा झाला आहे. पल्लवी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, अंगी मेहनतीची इच्छा असेल तर घरात बसूनही मोठा उद्योग उभा करता येतो. त्यांच्या यशाने अनेक महिलांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
सोशल मीडियावरून घेतली माहिती, नोकरी सोडून उभारला बिस्किट व्यवसाय, महिन्याला 2 लाख रुपयांची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल