नाशिक - नाशिक हे मिसळसाठी आता चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये विविध ठिकाणी मिसळ विक्री केली जात आहे. ती आजही त्याच पद्धतीने सुरू आहे. आता नाशिकमध्ये नवनवीन मिसळ केंद्रही मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळतात. अशाच एका प्रसिद्ध मिसळ सेंटरबाबत आपण जाणून घेणार आहेत.
नाशिकमध्ये काही मिसळ सेंटर असे आहेत, जे अनेक वर्षांपासून आपल्या चवीमुळे आजही ओळखले जातात. त्यामुळे त्या ठिकाणी गर्दीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यातलीच एक पाटील वाडा मिसळ हे सर्व नाशिकरांना माहिती आहे. येथील चुलीवरील मिसळ खाण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने येतात.
advertisement
त्याचप्रमाणे नाशिकच नव्हे तर बाहेरील पर्यटकही नाशिकमध्ये फिरण्यासाठी आल्यावर या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी येतात. मागील 7 वर्षांपासून नाशिकमध्ये ही पाटील वाडा मिसळ नाशिककरांच्या सेवेसाठी आजही चालू आहे. यांच्या मिसळच्या रस्सा हा काळ्या मसालाचा असतो. त्यात कुठलाही आर्टिफिशियल रंग टाकला जात नाही. त्यामुळे या ठिकाणी लहान मुलेदेखील आपल्याला आवडीने मिसळ खाताना दिसत असतात.
जास्तीच्या गाड्या सोडूनही तिकीट वेटिंगवरच, दिवाळीत रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय?
या मिसळची सुरुवात आप्पा पाटील यांनी सात वर्षांपूर्वी आपल्या वडिलांसोबत केली. आप्पा पाटील हे एक इंजीनिअर असून त्यांनी इंजिनिअरिंगचे क्षेत्र सोडल्यानंतर आपल्या शेतात काहीतरी उद्योग करावा. या संकल्पनेने सुरुवातीला एका छोट्या माध्यमात ही मिसळ सुरू केली होती. मात्र, नाशिककरांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. नाशिकच नव्हे तर नाशिकच्या बाहेरसुद्धा त्यांची चव पोहोचली आहे.
येथ मिसळची प्लेट 100 रुपयांना मिळते. यामध्ये शेव, मटकी, रस्सा, दोन पाव, दही कांदा, पापड अशा पद्धतीने ही मिसळ प्लेट आपल्याला खाण्यास मिळत असते. या मिसळ व्यवसायाच्या माध्यमातून आप्पा हे महिन्याला 8 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत, असे त्यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले. तर मग तुम्हालाही येथील मिसळची चव चाखायची असेल तर तुम्ही मोतीवाला कॉलेज जवळ, कॅनल रॉड, गंगापूर येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधी दरम्यान भेट देऊ शकतात.