जास्तीच्या गाड्या सोडूनही तिकीट वेटिंगवरच, दिवाळीत रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
diwali railway booking - दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने याआधीच जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले. यामध्ये पुण्याहून 250 हून अधिक जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे परराज्यासहित गावी जाणाऱ्या मार्गावर पुण्याहून गाड्या फुल्ल झाल्या आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : लवकरच आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. या दिवाळीत अनेक जण हे गावी जात असतात. यासाठी अनेकजण आधीच रेल्वे तिकीट बुक करून ठेवतात. त्यात रेल्वेच्या तिकिटासाठी 120 दिवस आधी बुकिंग करण्याची सुविधा सुरू केली आहे. मात्र, तरीही अनेक प्रवाशांचे तिकिट वेटिंगवर आहे. नेमकं किती वेटिंग आहे, कोणत्या गाड्यांना वेटिंग आहे, याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा आढावा.
advertisement
दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने याआधीच जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले. यामध्ये पुण्याहून 250 हून अधिक जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या 22 ते 25 ऑक्टोबर दरम्यान सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे परराज्यासहित गावी जाणाऱ्या मार्गावर पुण्याहून गाड्या फुल्ल झाल्या आहेत.
advertisement
परराज्यात जाणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेस, हटिया एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-दानापूर एक्स्प्रेस, चंडीगड संपर्कक्रांती एक्स्प्रेस, पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस या गाड्यांना रिग्रेट आहे. त्यामुळे प्रवाशांना आता दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.
दिवाळीत होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण आण्यासाठी आतापर्यंत पुण्याहून 180 जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आता यामध्ये अधिक 70 जादा गाड्यांचे नियोजन करून आता 250 जादा गाड्या सोडण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी दिली.
advertisement
सध्या 400 पेक्षा जास्त वेटिंग कन्फर्म तिकीट नसलेल्या प्रवाशांना दिवाळीत रेल्वेने प्रवास करणे चांगलेच महागात पडणार आहे. कारण पुण्याहून सुटणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांना 'रिग्रेट' सुरू झाले आहे.
या गाड्यांना आहे वेटिंग
पुणे-नागपूर, पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-दानापूर विशेष एक्स्प्रेस, पुणे-मालदा टाऊन एक्स्प्रेस, पुणे-मडगाव गोवा एक्स्प्रेस, कुर्ला-चेन्नई एक्स्प्रेस, सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 23, 2024 12:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
जास्तीच्या गाड्या सोडूनही तिकीट वेटिंगवरच, दिवाळीत रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय?