गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांच्या अथक परिश्रमातून हे शक्य झाले आहे. या गावात 7 हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आला असल्याचे रहिवासी दिलीप निकम यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
नादरपूर ग्रामपंचायती मार्फत पत्तरवाळी तयार करण्याचा व्यवसाय 2 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला आहे, हा व्यवसाय चालवण्यासाठी 4 वेगवेगळ्या मशिनरीचा वापर केला जातो, यातून पत्तरवाळी तयार केल्या जातात. तसेच त्यांची पॅकिंग देखील याच ठिकाणी केली जाते. यामुळे गावातील 6 लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून प्रत्येकी एक जण 60 हजार रुपयांची कमाई करत असल्याचे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर गणेश निकम यांनी सांगितले.
advertisement
Farmer Success Story: नववी पास शेतकरी झाला करोडपती, शेती ठरली फायदाची, असा केला भारी प्रयोग!
उच्चशिक्षित तरुण नोकरी सोडून गावात करतोय दुग्ध व्यवसाय
पत्तरवाळी व्यवसाय या गावात आहेच पण काही तरुण मंडळी आपापल्या वेगवेगळ्या व्यवसायात व्यस्त आहे. मधुकर निकम या तरुणाने पुणे विद्यापीठातून एमसीए केले असून तो नोकरी करत होता मात्र कोरोना काळात नोकरी सोडावी लागली त्यानंतर मधुकरने गावातच दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. 3 गाईंपासून सुरुवात करून या गाईंची संख्या आज 42 एवढी झाली आहे यातून 200 ते 250 लिटर दूध दररोज काढले जाते. तसेच सव्वा 1 लाख रुपयांची खर्च वजा कमाई होत असल्याचे मधुकरने सांगितले आहे.
तसेच येथे दूध संकलन केले जाते, शेतकरी, पशुपालकांकडून त्यांच्या जनावरांचे काढलेले दूध गोळा करणे ही डेअरी उद्योगासाठी पहिली पायरी मानली जाते. दुधाच्या गुणवत्तेनुसार शेतकऱ्यांना या केंद्राद्वारे पैसे दिले जाते. दूध खराब होऊ नये म्हणून एका मोठ्या टँकमध्ये थंड करून भरले जाते त्यानंतर थंड केलेले दूध मोठ्या टँकरमध्ये भरून डेरी प्लांट पर्यंत पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते.
या नादरपूर गावात 4 हजार लिटर दुधाचे दररोज संकलन केले जाते त्यामुळे 2 हजार रुपयांपर्यंत रोज मिळत असल्याचे अविनाश शिंगारे सांगितले आहे तसेच तरुण वर्ग माहिती घेण्यासाठी येथे येत असल्याचे देखील सांगतो. नादरपूर गाव सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असल्यामुळे या गावाला भेट देण्यासाठी अनेक नागरिक येत असतात, तसेच या गावाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.