TRENDING:

लोन हवंय? चुकूनही करु नका ही 5 कामं, अन्यथा प्लॅन होईल फेल 

Last Updated:

अनेकदा लोकांचा पगार चांगला असुनही त्यांचं पर्सनल लोन रिजेक्ट होतं. पण असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.

advertisement
नवी दिल्ली : अनेकदा लोक विचार करतात की, चांगली सॅलरी, टॅक्स भरणे किंवा एखादं मोठं कर्ज असणं हे पर्सनल लोनसाठी पुरेसं आहे. मात्र बँक फक्त तुम्ही किती ईएमआय भरु शकता हे पाहत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात अचानक आलेल्या अडचणींमध्येही तुम्ही लोन फेडू शकला का? हे बँका पाहतात. पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर कोणत्या चुका करु नयेत याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
पर्सनल लोन
पर्सनल लोन
advertisement

1. अर्धवट किंवा खराब क्रेडिट हिस्ट्री 

अनके लोकांची क्रेडिट हिस्ट्री खुप लहान असते. म्हणजेच त्यांनी पहिले जास्त लोन किंवा क्रेडिट कार्डचा वापर केलेला नसतो. अशावेळी बँकांना हे समजत नाही की, तुम्ही कर्ज सांभाळण्यास किती जबाबदार आहात. तसंच नुकतंच एखादा ईएमआय लेट झाला असेल एखाद्या लोनला सेटल दाखवलं गेलं असेल किंवा क्रेडीट कार्ड पेमेंट मिस झाली असेल तर मोठा निगेटिव्ह संकेत मानला जातो. बँक परफेक्शन नाही तर स्टेबिलिटी पाहते.

advertisement

2. चांगला पगार, पण खिसा अडचणीचा

तुमचे उत्पन्न चांगले असले तरी, त्याचा एक मोठा भाग होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन, शाळेची फी किंवा BNPL हप्त्यांमध्ये जात असेल, तर बँका नवीन कर्ज देण्यास कचरतात.

सेबीचा इशारा! शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांना येऊ शकते टॅक्स नोटीस, राहा सावधान

3. क्रेडिट कार्डचा जास्त वापर 

advertisement

तुम्ही दरमहिन्याला क्रेडिट कार्डच्या पूर्ण लिमिटचा वापर करत असालतर बँकेला वाटतं की, तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. तुम्ही किमान देय रक्कम भरली किंवा वेळेवर पैसे दिले तरी, सातत्याने जास्त शिल्लक रक्कम ही जोखीम दर्शवते. संतुलित आणि कमी वापर बँकेला अधिक आत्मविश्वास देतो.

4. उत्पन्नात वारंवार बदल 

पर्सनल लोन गॅरंटीशिवाय असते. यामुळे बँक तुमच्या इन्कमची स्टेबिलिटीवर खास लक्ष देतात. नुकतीच नोकरी बदलली असेल, वारंवार जॉब स्विच केला असेल. प्रोबेशनवर असाल, दीर्घ ब्रेक घेतला असेल किंवा फ्रीलान्स इन्कम अनियमित असेल तर बँका सतर्क होतात.

advertisement

या ट्रिकने कमी होईल तुमचं क्रेडिट कार्डचं व्याज! बँका हे कधीच सांगणार नाहीत

5. खूप जास्त कर्ज अर्ज

प्रत्येक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड अर्ज तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर नोंदवला जातो. तुम्ही कमी कालावधीत अनेक बँकांमध्ये अर्ज केला तर बँका त्याला "पैशांची तातडीची गरज" म्हणून पाहतात. एकाच नकारानंतर वारंवार अर्ज केल्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. प्रथम समस्या सोडवणे आणि नंतर पुन्हा अर्ज करणे चांगले.

advertisement

बँका काय पाहतात?

बँका पगाराकडे नाही तर तुमच्या आर्थिक स्थिरतेकडे पाहतात. त्यांना हे समजून घ्यायचे आहे की वैद्यकीय आणीबाणी, नोकरी बदल किंवा काही वाईट महिन्यांतही तुमचे ईएमआय वेळेवर भरले जातील का. कमी क्रेडिट कार्ड वापर, मर्यादित कर्ज, स्टेबिल नोकरी आणि स्वच्छ क्रेडिट रेकॉर्ड हे कर्ज मंजुरीचे खरे गुरुकिल्ली आहेत.

मराठी बातम्या/मनी/
लोन हवंय? चुकूनही करु नका ही 5 कामं, अन्यथा प्लॅन होईल फेल 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल