TRENDING:

No-Cost EMI खरंच मोफत की काही हिडन चार्ज आहेत? खरेदीपूर्वी घ्या जाणून 

Last Updated:

Zero-Cost EMI हा पूर्णपणे मोफत असतो की नाही हे आपण आज पाहणार आहोत. यामुळे हे खरंच फायद्याची की असतं की नाही पाहूया...

advertisement
नवी दिल्ली : सध्याच्या काळात ऑनलाइन शॉपिंग किंवा स्टोरवर NO-Cost EMI चा बोर्ड पाहताच आपल्याला वाटतं की, आता महागडा फोन किंवा लॅपटॉप खरेदी करणं किती सोपं झालंय. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, बँका किंवा दुकानदार कोणत्याही फायद्याशिवाय तुम्हाला ईएमआयची सुविधा का देताय? खरंतर 'झिरो-कॉस्ट' चा अर्थ 'झिरो खर्च' नसतो. यामागे अनेक हिडन चार्ज असतात. जे समजून घेणे तुमच्यासाठी खुप आवश्यक आहे.
नो कॉस्ट ईएमआय
नो कॉस्ट ईएमआय
advertisement

1.व्याज संपत नाही फक्त लपते 

सत्य असं आहे की, बँका त्यांचं व्याज सोडत नाही. मग होतं काय, तर दुकानदार तुम्हाला प्रोडक्टवर मिळणारं डिस्काउंट थेट न देता, त्या पैशांना बँकेच्या व्याजात अॅडजस्ट करतात म्हणजे, तुम्ही जे सामान कॅशमध्ये स्वस्तात घेऊ शकता. ते तुम्ही ईएमआयच्या नातात पूर्ण किंमतीत खरेदी करता.

2. प्रोसेसिंग फीस आणि GSTचा धक्का

advertisement

व्याजदर शून्य दिसत असला तरी, बँका तुमच्याकडून प्रोसेसिंग फीस आकारतात. हे सामान्यतः वस्तूच्या मूल्याच्या 1% ते 3% पर्यंत असते. याव्यतिरिक्त, तुम्हाला लपवलेल्या व्याजाच्या भागावर 18% जीएसटी देखील भरावा लागतो, जो दरमहा तुमच्या क्रेडिट कार्ड बिलात जोडला जातो.

लोन हवंय? चुकूनही करु नका ही 5 कामं, अन्यथा प्लॅन होईल फेल

advertisement

3. 'कॅश डिस्काउंट' चं नुकसान 

समजा एक फोन 60,000 रुपयांचा आहे. तुम्ही लगेच पूर्ण पेमेंट केली. तर कदाचित तुम्हाला तो 55 हजार रुपयांमध्ये मिळू शकतो. मात्र No-Cost EMI निवडताच दुकानदार ते 5 हजार रुपयांचं डिस्काउंट काढून टाकते. म्हणजे तुम्ही विना व्याजाच्या नावावर 5 हजार रुपये जास्त फेडावे लागतात.

पतीसोबत जॉइंट अकाउंट ओपन करताय? एक चूक पडू शकते महाग, राहा सावध

advertisement

4. क्रेडिट कार्ड लिमिट ब्लॉक होते

तुमची कार्ड लिमिट ₹1 लाख असेल आणि तुम्ही 40,000 रुपये किमतीच्या वस्तू EMI वर खरेदी केल्या तर तुमची खर्च करण्याची क्षमता लगेच 60,000 रुपयांपर्यंत कमी होईल. तुम्ही लहान हप्ते भरत असलात तरी, बँक तुमच्या लिमिटमधून संपूर्ण रक्कम ब्लॉक करते.

मराठी बातम्या/मनी/
No-Cost EMI खरंच मोफत की काही हिडन चार्ज आहेत? खरेदीपूर्वी घ्या जाणून 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल