Small Savings Schemes या भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या सुरक्षित गुंतवणूक योजना आहेत. ज्यांचा उद्देश लोकांना बचतीसाठी प्रोत्साहित करणे आहे. या योजना खासकरून लहान गुंतवणूकदार, वरिष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकीवर सरकार एक निश्चित व्याजदर देते, जो तिमाही आधारावर ठरवला जातो.
advertisement
जुलै–सप्टेंबर 2025 साठी Small Savings Schemes चे व्याज दर:
पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) – 7.1%
सुकन्या समृद्धी योजना (SSY) – 8.2%
सीनियर सिटिझन सेव्हिंग्स स्कीम (SCSS) – 8.2%
नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) – 7.7%
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट (FD) – 6.9% ते 7.5% (1 ते 5 वर्षांच्या मुदतीसाठी)
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट (RD) – 6.7%
किसान विकास पत्र (KVP) – 7.5%
पोस्ट ऑफिस मासिक आय योजना (POMIS) – 7.4%
ही सलग सहावी तिमाही आहे की या योजनांवरील व्याज दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, वित्त वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (1 जुलै 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत) विविध स्मॉल सेविंग्स स्कीम्सवरील व्याजदर पहिल्या तिमाहीत (1 एप्रिल 2025 ते 30 जून 2025 पर्यंत) अधिसूचित दरांप्रमाणेच राहतील.