टाकाऊ पासून टिकाऊ..
मूळचे धुळ्याचे असणारे प्रदीप जाधव हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. चांगल्या कंपनीत लाखभर पगाराची नोकरी करत होते. मात्र स्वतःचा काहीतरी व्यवसाय उभा करायचा हा ध्यास घेत त्यांनी 2020 साली गीगांटीक्स डेकोर हा व्यवसाय सुरू केला.
advertisement
व्यवसाय सुरू केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत कोरोनामुळे लॉकडाऊन पडले आणि नुकताच सुरू झालेला व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. परंतु प्रदीप यांनी हार मानली नाही. त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं. आज त्यांचे 2,000 हून अधिक प्रॉडक्ट्स भारतभर एक्सपोर्ट होतात.
आज गीगांटीक्स डेकोरमध्ये फर्निचर, सेल्फी पॉइंट्स, फूड स्टॉल्स आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. निसर्गाचं संवर्धन लक्षात ठेवून रिसायकल मटेरियलचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही झाली आहे. त्यांच्या या व्यवसायातून वर्षाला तब्बल 2 कोटीची उलाढाल होते.