Success Story : शिक्षण फक्त दहावी, घरातूनच सुरू केला केक बनविण्याचा व्यवसाय, स्टॉलमधून महिन्याची कमाई तर पाहाच
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
निलोफर सैयद या फक्त 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या असूनही व्यवसाय करण्याची आवड त्यांनी जोपासली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी घरातूनच केक बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.
नाशिक : नाशिकच्या निलोफर सैयद या फक्त 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या असूनही व्यवसाय करण्याची आवड त्यांनी जोपासली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी घरातूनच केक बनविण्याचा व्यवसाय (होम बेकरी) सुरू केला. त्यांच्या हातचे केक उत्तम दर्जाचे असल्याने त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली. वाढत्या मागणीमुळे आता निलोफर रोज सायंकाळी अशोका मार्गावर आपला केक स्टॉल लावतात. त्यामुळे त्यांचे मार्केटिंग चांगले होत असून दररोजचा व्यवसायही वाढत आहे, असे त्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
निलोफर सैयद यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले. लवकर लग्न झाल्यामुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. लग्नानंतर काही आर्थिक अडचणी आल्यामुळे त्यांनी काही काळ इतरांच्या हाताखाली काम केले. मात्र फॅमिली प्रॉब्लेम्समुळे त्यांना नोकरी सोडून घर सांभाळावे लागले.
काम करण्याची आवड असल्याने घरात बसून राहणे त्यांना जमत नव्हते.
advertisement
एके दिवशी त्यांनी घरी केक बनविण्याचा प्रयत्न केला, पण पहिलाच केक खराब झाला. त्यामुळे कुटुंबातील लोकांनी त्यांची थोडी थट्टा केली. मात्र त्याच क्षणी निलोफर यांनी ठरवले की, हा केक बनवणे शिकायचेच त्यांनी बेकिंगचे क्लासेस केले आणि केक बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यानंतर त्यांनी विचार केला की, आपण ही कला शिकलोच आहोत, तर घरातूनच याचा व्यवसाय का करू नये? अशा विचारातून त्यांनी होम बेकरी सुरू केली.
advertisement
त्यांच्या केकची गुणवत्ता चांगली असल्यामुळे लवकरच ऑर्डर्स वाढू लागल्या. घरातून काम करत असतानाच त्यांना चांगला नफा मिळू लागला. त्यामुळे त्यांनी बाहेर एक छोटा स्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून त्या अशोका मार्गावर दररोज केक स्टॉल लावत आहेत आणि उत्तम प्रतिसाद मिळवत आहेत. यामधून महिन्याला 60 ते 70 हजार रुपये कमाई त्यांची होत आहे.
advertisement
निलोफर सैयद सांगतात की, शिक्षण कमी असले तरीही आपल्याला आवडत्या क्षेत्रात मेहनतीने काम करून यश मिळवता येते. त्यांच्या प्रवासातून अनेक महिलांना प्रेरणा मिळत आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
November 21, 2025 5:40 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : शिक्षण फक्त दहावी, घरातूनच सुरू केला केक बनविण्याचा व्यवसाय, स्टॉलमधून महिन्याची कमाई तर पाहाच

