Success Story : घरातून क्लाऊड किचन, आता उभारला कॅफे, मायलेकाची जोडी महिन्याला करतेय 8 लाखांची कमाई

Last Updated:

फक्त 99 रुपयांत मिळणारा चायनीज कॉम्बो, भरपूर क्वांटिटी, चविष्ट पदार्थ आणि परवडणाऱ्या किमती यामुळे येथे दिवसभर गर्दी पाहायला मिळते.

+
घरातून

घरातून क्लाऊड किचन ते कॅफेपर्यंतचा प्रवास; आई आणि मुलाच्या जोडीची महिन्याला लाखोंची कमाई

मुंबई : दादर–माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेजसमोर सुरू झालेलं मुंबई वाईफ कॅफे आज सगळ्यांच्या चर्चेत आहे. फक्त 99 रुपयांत मिळणारा चायनीज कॉम्बो, भरपूर क्वांटिटी, चविष्ट पदार्थ आणि परवडणाऱ्या किमती यामुळे येथे दिवसभर गर्दी पाहायला मिळते. या लोकप्रिय कॅफेच्या मागे आहे विना प्रभू आणि त्यांचा मुलगा दीपेन प्रभू यांची मेहनत, धडपड आणि कोरोनाकाळापासून सुरू झालेला एक प्रेरणादायी प्रवास.
कोरोनाच्या काळात मोफत 800 टिफिन 
कोरोना लॉकडाऊन दरम्यान दादरमध्ये अनेक जणांना जेवणाची अडचण भासत होती. हे पाहून विना प्रभू यांनी तब्बल 800 टिफिन मोफत वाटले. त्या स्वतः उत्तम गायिका आहेत, पण त्याचबरोबर उत्कृष्ट स्वयंपाकही करतात. लोकांना त्यांचा स्वादिष्ट स्वयंपाक आवडू लागला आणि याच अनुभवाने त्यांना मोठं बळ मिळालं. यानंतर त्यांनी घरातूनच वीपी किचन (Vina Prabhu Kitchen) सुरू केलं आणि काही महिन्यांत ते परिसरात खूप लोकप्रिय झालं.
advertisement
विना प्रभू यांचा मुलगा दीपेन प्रभू याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतल्यानंतर कॉर्पोरेटमध्ये डेटा ऍनालिस्ट म्हणून काम सुरू केलं होतं. पण आईचं स्वप्न आणि स्वतःची इच्छा दोन्ही एकच होतं. आपलं काहीतरी स्वतंत्र करायचं. मग दीपेनने नोकरीचा राजीनामा दिला आणि आईसोबत व्यवसायात पूर्ण वेळ लक्ष देण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2024 मध्ये उभं राहिलं मुंबई वाईफ कॅफे
गेल्या वर्षी 2024 मध्ये रुपारेल कॉलेजसमोर त्यांनी मुंबई वाईफ कॅफे सुरू केलं. कॅफे सुरू करताना एकच उद्देश मनात होता, मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारे, ताजे आणि चविष्ट जेवण द्यायचं. कॅफेमध्ये आज विविध व्हेज-नॉनव्हेज पदार्थ मिळतात. रोज ताजी भाजीच वापरली जाते, शिळा माल मुळीच नाही. दीपेन प्रभू स्वतः दररोज दादर मार्केटला जाऊन घटकसामग्री आणतात, क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही उत्तम प्रकारे देण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
7 ते 8 लाखांपर्यंत मासिक कमाई
आज मुंबई वाईफ कॅफे महिन्याला 7–8 लाखांची उलाढाल करतोय. कोरोनाकाळात मोफत टिफिन देणाऱ्या एक साध्या गृहिणीपासून ते स्वतःचा ब्रॅण्ड उभी करणाऱ्या उद्योजिकांपर्यंतचा विना प्रभू यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांचा कॅफे आज विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी आणि चायनीज-लव्हर्ससाठी आवडतं ठिकाण बनलाय.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : घरातून क्लाऊड किचन, आता उभारला कॅफे, मायलेकाची जोडी महिन्याला करतेय 8 लाखांची कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement