2008 ला प्रसाद लुटेच्या वडिलांनी पशुखाद्य सरकी पेंड या व्यवसायाची सुरुवात ही छोट्या दुकानापासून केली होती. सुरुवातीला दहा बाय दहाच्या दुकानातून व्यवसाय उभा केला. हा दहा वर्षांचा खडतर प्रवास करून त्यांनी 2018 ला साई समर्थ ऑइल मिल या नावाने सरकी पेंडचा कारखाना चालू केला. त्यात त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव आले. या व्यवसायात ते सरकी पेंडचे प्रोडक्शन करतात. त्यानंतर व्यवसायात वाढ करत ते तिन्ही मका भरडा, गहू भरडा, मिक्स भरडा व इतर गाईचे पशुखाद्यांचा व्यवसाय करत आज ते वर्षाला 30 ते 40 लाखापर्यंतची कमाई करत आहेत.
advertisement
Agriculture News: शेतकऱ्याची कमाल, शेतात फवारणीसाठी बनवलं पंचामृत, असा होणार फायदा, Video
प्रसाद लुटे याने 2018 ला बीकॉम झाल्यानंतर जॉब न करता व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि घरच्याच व्यवसायात अजून वाढ केली. 2018 मधील त्यांनी ऑइल मिल प्रोडक्शन चालू आहे. त्यात त्यांनी एकच उद्दिष्ट ठेवले होते की क्वालिटी कॉम्प्रमाईज करायचं नाही. त्यामुळे राहता परिसरात त्यांच्या गोमाता या नावाने सरकी पेंडचा ब्रँड आहे. हा ब्रँड लोक नावाने खरेदी करतात.
2018 ला मील यशस्वीरित्या चालू झाल्यानंतर 2021 मध्ये त्याने त्याचा पारंपारिक व्यवसाय लाकडी तेल घाणा सुरू केला. त्यात ते शेंगदाणा तेल, करडई तेल, सरकी तेल उपलब्ध करून दिले. नॉन रिफाइंड त्यांनी मार्केटमध्ये उपलब्ध करून दिले आहे. यात चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर तेलात वाढ करत त्यांनी मोहरी तेल, जवस तेल तसेच खोबरे तेलाची सुरुवात केली.
त्यानंतर 2022 ला मका भरण्याची मशीन घेतली आणि त्यातून त्याने मका भरडा, गहू भरडा यांचे प्रोडक्शन चालू केले. व्यवसायात सातत्य ठेवून प्रामाणिक कष्ट केले तर व्यवसाय नक्कीच यशस्वी होतो.