TRENDING:

उद्या देशभर बँकिंग सेवा ठप्प, Bank कर्मचाऱ्यांची संपाची घोषणा; चौथ्या दिवशी बँका बंद, पूर्ण शटडाऊन

Last Updated:

Bank Employees Strike: सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे मंगळवारी बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होणार आहेत. 5-डे वर्किंगची मागणी आणि प्रलंबित अधिसूचनेविरोधात UFBU ने हा संप पुकारला आहे.

advertisement
नवी दिल्ली/मुंबई: देशभरातील सरकारी बँकांचे कर्मचारी उद्या मंगळवार 27 जानेवारी 2026 रोजी संपावर जाणार असून, त्यामुळे बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. PTI च्या वृत्तानुसार युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे आठवड्यात केवळ पाच दिवस काम (5-Day Working Week) ही पद्धत तात्काळ लागू करावी.
News18
News18
advertisement

या संपामुळे सरकारी बँकांमधील रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स, शाखांमधील दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार आहे. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात आधीच चौथा शनिवार (23 जानेवारी), रविवार (25 जानेवारी) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) या सुट्ट्यांमुळे बँका बंद होत्या. त्यामुळे हा सलग चौथा दिवस असेल, जेव्हा सरकारी बँकांचे कामकाज प्रभावित होणार आहे. मात्र, खासगी बँकांवर या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही, कारण त्या UFBU चा भाग नाहीत.

advertisement

बँक कर्मचारी संपावर का जात आहेत?

बँक कर्मचारी आणि सरकार यांच्यातील वादाचे मुख्य कारण म्हणजे शनिवारची सुट्टी. बँक कर्मचारी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून ‘5-डे वर्क वीक’ लागू करण्याची मागणी करत आहेत. मार्च 2024 मध्ये इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक युनियन्स यांच्यात झालेल्या 12व्या द्विपक्षीय करारात सर्व शनिवार सुट्टी देण्यावर सहमती झाली होती.

advertisement

मात्र या करारानंतरही सरकारकडून अद्याप अधिकृत अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी करण्यात आलेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. युनियन्सचे म्हणणे आहे की, ही मागणी कोणतीही अतिरेकी नसून संतुलित कामकाजासाठी आहे. त्यासाठी कर्मचारी दररोज 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यासही तयार आहेत.

सध्या बँका महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार एवढ्याच दिवशी बंद असतात. आता सर्व शनिवार सुट्टी जाहीर करणारी अधिसूचना सरकारने तात्काळ काढावी, अशी ठाम मागणी युनियन्स करत आहेत.

advertisement

या संपाचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल?

शाखांमधील कामकाज ठप्प:

जर तुम्हाला बँकेत जाऊन रोख रक्कम जमा करायची, नवीन चेकबुक घ्यायचे, केवायसी (KYC) अपडेट करायचे असेल, तर उद्या या कामांसाठी मोठी अडचण येऊ शकते.

चेक क्लिअरन्समध्ये विलंब:

चेक क्लिअर करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने सरकारी बँकांमार्फतच होते. संपामुळे चेक क्लिअर होण्यास 2 ते 3 दिवसांचा उशीर होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे पेमेंट अडकण्याची शक्यता आहे.

advertisement

ATM मध्ये रोख टंचाई:

सलग तीन दिवस बँका बंद राहिल्यामुळे एटीएममध्ये रोख रक्कम संपण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः लहान शहरे आणि निवासी भागांतील एटीएम उद्या रिकामे मिळण्याची शक्यता आहे.

कर्ज व सरकारी कामांवर परिणाम:

जर तुमचे कर्ज मंजुरी, बँक एनओसी (NOC) किंवा इतर सरकारी कामे प्रलंबित असतील, तर ती आता बुधवार किंवा गुरुवारपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

कोणत्या सेवा सुरू राहणार?

UPI आणि डिजिटल पेमेंट:

गुगल पे, फोनपे, पेटीएम, भीम UPI यांसारख्या सर्व डिजिटल पेमेंट सेवा पूर्णपणे सुरू राहतील. दुकानात खरेदी किंवा ऑनलाइन व्यवहार करताना कोणतीही अडचण येणार नाही.

इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग:

मोबाइल अ‍ॅप किंवा संगणकाद्वारे IMPS, NEFT, RTGS सारखे पैसे ट्रान्सफर, बॅलन्स तपासणे, बिल पेमेंट आदी सेवा सुरू राहतील.

खासगी बँका:

HDFC बँक, ICICI बँक, Axis बँक यांसारख्या सर्व प्रमुख खासगी बँका नेहमीप्रमाणे खुल्या राहतील आणि त्यांच्या ग्राहकांचे कामकाज सुरळीत चालू राहील.

एटीएम सेवा:

तांत्रिकदृष्ट्या एटीएम बंद केले जाणार नाहीत. एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध असल्यास, कार्डद्वारे पैसे काढता येतील. मात्र रोख संपल्यास अडचण येऊ शकते.

एकूणच, सरकारी बँकांचा संप लक्षात घेता नागरिकांनी महत्त्वाची बँकिंग कामे पुढे ढकलणे किंवा डिजिटल पर्यायांचा वापर करणे अधिक सुरक्षित ठरेल.

मराठी बातम्या/मनी/
उद्या देशभर बँकिंग सेवा ठप्प, Bank कर्मचाऱ्यांची संपाची घोषणा; चौथ्या दिवशी बँका बंद, पूर्ण शटडाऊन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल