TRENDING:

इराणच्या हल्ल्याने गॅस मार्केटमध्ये भूकंप; युरोपमध्ये 50% दर वाढले, भारतावर काय होणार परिणाम?

Last Updated:

इराण आणि इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे कतारने LNG उत्पादन थांबवले, युरोपमध्ये गॅस दरात ५० टक्क्यांहून अधिक वाढ, भारताची ऊर्जा सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला.

advertisement
मिडल ईस्टमध्ये पेटलेल्या युद्धाचा वणवा आता केवळ सीमेपुरता मर्यादित राहिला नसून, त्याने जागतिक अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडायला सुरुवात केली आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षाचा सर्वात मोठा फटका ऊर्जा क्षेत्राला बसला असून, युरोपमध्ये नैसर्गिक वायूच्या (LNG) किमतीत अवघ्या काही तासांत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हे युद्ध आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर वार करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
News18
News18
advertisement

कतारचा मोठा निर्णय; जगाचं टेन्शन वाढलं

जगातील सर्वात मोठा एलएनजी निर्यातदार देश असलेल्या कतारने सोमवारी आपल्या उत्पादनावर तात्पुरती बंदी घातल्याची घोषणा केली. इराणच्या ड्रोन हल्ल्यात कतारच्या दोन मुख्य प्रोसेसिंग प्लांटना लक्ष्य करण्यात आले, त्यानंतर कतार एनर्जीने खबरदारीचा उपाय म्हणून रस लाफान प्लांटमधील उत्पादन थांबवले आहे. विशेष म्हणजे, जगाच्या एकूण गॅस पुरवठ्यापैकी २० टक्के हिस्सा एकटा कतार सांभाळतो. पुरवठा थांबताच जागतिक बाजारात गॅसच्या किमती चार वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

advertisement

युरोपमध्ये हाहाकार, रशिया-युक्रेन युद्धाची आठवण

कतारमधील उत्पादन थांबताच एम्सटर्डमच्या गॅस मार्केटमध्ये खळबळ उडाली. गॅसचे दर ४५ ते ५० टक्क्यांनी वधारून ४६.१९ युरो प्रति मेगावॉटवर पोहोचले आहेत. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जर हा पुरवठा असाच खंडित राहिला, तर २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी जे संकट आलं होतं, त्याहून भीषण परिस्थिती ओढवू शकते.

advertisement

भारताची धाकधूक का वाढली?

हे युद्ध युरोपमध्ये असलं तरी त्याचे चटके भारताला बसणार आहेत. त्याचं कारण म्हणजे भारताची कतारवर असलेली भिस्त.भारत आपल्या गरजेच्या एकूण एलएनजीपैकी तब्बल ४० ते ४२ टक्के गॅस एकट्या कतारकडून आयात करतो. २०२५ मध्ये भारताने २५.६ दशलक्ष टन एलएनजी आयात केला, त्यातील १०.९ दशलक्ष टन केवळ कतारमधून आला होता. जर कतारमधून येणारा पुरवठा थांबला किंवा विस्कळीत झाला, तर भारतात सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते.

advertisement

होर्मुझची सामुद्रधुनी बनली डेंजर झोन

जगातील २० टक्के इंधन ज्या मार्गातून जातं, त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ वर आता युद्धाचे सावट आहे. अनेक मोठ्या विमा कंपन्यांनी या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना विमा कवच देण्यास नकार दिला आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढणार असून, त्याचा अंतिम भार ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.

पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे

advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील ही मोहीम काही आठवडे चालू शकते, असे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत जर कतारमधील उत्पादन दीर्घकाळ बंद राहिले, तर आशियाई देशांसह भारताच्या सरकारी बजेटवर मोठा ताण येऊ शकतो.

मराठी बातम्या/मनी/
इराणच्या हल्ल्याने गॅस मार्केटमध्ये भूकंप; युरोपमध्ये 50% दर वाढले, भारतावर काय होणार परिणाम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल