भुलेश्वर मार्केटमध्ये पारंपरिक राख्यांपासून आधुनिक राख्यांपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. सर्वात कमी दराची राखी फक्त 25 पैसे प्रती नग या दराने उपलब्ध असून, ही पारंपरिक लाल-हिरव्या रंगांची झिरमिरी राखी आहे. चमकदार मोत्यांची राखी 12 रुपये डझनपासून तर रंगीबेरंगी मण्यांनी सजलेली राखी 4 रुपये प्रति नगापासून सुरू होते.
फुले, माळा, पडदे अन् बरंच काही...; मुंबईत 3 रुपयांपासून गणपती डेकोरेशन साहित्य, Location
advertisement
लहान मुलांसाठी खास राख्या
लहान मुलांसाठी कार्टून राख्यांची विशेष रेलचेल आहे. छोटा भीम, डोरेमॉन, स्पायडरमॅन यांसारख्या डिझाईन्समध्ये मिळणाऱ्या राख्या 48 रुपये डझन दराने विकल्या जात आहेत. तसेच, बटण दाबल्यावर लखलखणारी लाईटिंग राखी 20 रुपये प्रती पीस दराने उपलब्ध आहे.
अगदी स्वस्तात राखी
मेटॅलिक चमक असलेल्या चांदीसारख्या राख्या 17 रुपये पीस दराने मिळत असून, जड मण्यांच्या राख्या 126 रुपये डझन पासून सुरू होतात. हाताने तयार केलेल्या राख्या 36 रुपये डझन दराने विकल्या जात आहेत. अमेरिकन डायमंड (AD) राख्यांचा देखील पर्याय येथे आहे, त्यांची किंमत 305 रुपये डझन आहे. रुद्राक्ष राख्या 21 रुपये डझन दराने मिळतात. या बाजारातील विविधता आणि माफक दरामुळे मज्जिद बंदर पुन्हा एकदा राखी खरेदीसाठी हॉटस्पॉट बनलं आहे.