Ganeshotsav 2025: फुले, माळा, पडदे अन् बरंच काही...; मुंबईत 3 रुपयांपासून गणपती डेकोरेशन साहित्य, Location

Last Updated:

Ganeshotsav 2025: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून डेकोरेशनच्या साहित्याने बाजार सजू लागले आहेत. तुम्ही देखील सजावट साहित्य खरेदी करणार असाल तर मुंबईत 3 रुपयांपासून मिळतंय.

+
Ganeshotsav

Ganeshotsav 2025: फुले, माळा, पडदे अन् बरंच काही...; मुंबईत 3 रुपयांपासून गणपती डेकोरेशन साहित्य, Location

मुंबई: सणासुदीचे दिवस सुरू झाले असून गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गणपती डेकोरेशनसाठी हवे असलेले साहित्य आता अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या मालाड (पश्चिम) स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ‘ माँ शक्ती’ या होलसेल दुकानात डेकोरेशनचे साहित्य केवळ 3 रुपयांपासून मिळत आहे.
या दुकानात विविध प्रकारच्या फुलांचे पीस फक्त 3 रुपयांना मिळतात. झेंडूच्या माळाही वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध आहेत. लहान माळा 80 रुपयांना, मध्यम 120 रुपयांना, तर 5 फूट लांब माळा केवळ 350 रुपयांना मिळते. यासोबतच गणपती मंडप सजवण्यासाठी लागणारे तोरण, रांगोळीचे छापे, रेडीमेड रांगोळी देखील येथे विक्रीस उपलब्ध आहे. रांगोळीचे छापे 30 रुपयांपासून तर रेडीमेड रांगोळी 60 रुपयांपासून मिळते.
advertisement
फुलांचे मोठे फ्लॉवर पॉट 250 रपये, लटकन 300 रुपयांत डझन, 50 मीटरपासून कपडा, नेटमध्ये पाहिजे असेल तर 25 रुपये मीटरपासून मिळतो. फुलांचे बुके 120 रुपयांपासून, फुलांपासून सजवलेलं गेट 350 रुपयांपसून मिळते. हेच नव्हे तर, गणपतीसाठी लागणारे हिरवे प्लास्टिक गवत, कृत्रिम पानफुलांची गेटसुद्धा येथे मिळते.
advertisement
ग्राहकांना हवे असल्यास ते स्वतःच्या डिझाइननुसार मोठी तोरणे बनवून घेऊ शकतात. तसेच घरी डेकोरेशन तयार करू इच्छिणाऱ्यांसाठी रॉ मटेरियलही येथे उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण डेकोरेशन साहित्य होलसेल दरात मिळत असल्यामुळे मालाड येथील 'माँ शक्ती' हे दुकान गणपती डेकोरेशनसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ganeshotsav 2025: फुले, माळा, पडदे अन् बरंच काही...; मुंबईत 3 रुपयांपासून गणपती डेकोरेशन साहित्य, Location
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement