Ganeshotsav 2025: बाप्पांच्या मूर्ती महागल्या! सव्वा फुटाच्या गणेशमूर्तीसाठी 15000 मोजावे लागणार, कारण काय?

Last Updated:

Ganeshotsav 2025: गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यांवर आला असून कारागिरांची मूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे. यंदा मूर्तीच्या दरांत 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Ganeshotsav 2025: बाप्पांच्या मूर्ती महागल्या! सव्वा फुटाच्या गणेशमूर्तीसाठी 15000 मोजावे लागणार, कारण काय?
Ganeshotsav 2025: बाप्पांच्या मूर्ती महागल्या! सव्वा फुटाच्या गणेशमूर्तीसाठी 15000 मोजावे लागणार, कारण काय?
मुंबई: गणेशोत्सव काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कारागिरांची गणिशमूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे. यंदा डेकोरेशनच्या थीमनुसार बाप्पांची मूर्ती बनवून घेण्याकडे कल वाढला आहे. कारागिरांची कमतरता आणि थीमनुसार मूर्ती बनवण्यासाठी लागणारा अधिकचा वेळ यामुळे गणेशमूर्तींच्या किमती देखील 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. शाडू मातीपासून बनवलेल्या एक ते सव्वा फुटाच्या मूर्तीसाठी 10 ते 15 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
सध्याच्या काळात डेकोरेशनच्या थीमनुसार गणेशमूर्ती घडवण्याकडे कल वाढत आहे. आता बाप्पांच्या आगमनाला दीड महिन्यांच्या काळ राहिला आहे. शाडू मूर्ती बनवण्यासाठी आठ ते दहा महिने आधीच ऑर्डर घेतलेल्या असतात.  त्यामुळे गणेशचित्र शाळेत मुर्तिकांरांची दिवसरात्र लगबग सुरू आहे. ग्राहक एखादे चित्र घेऊन येतात आणि थीम सांगून जातात. त्यानुसार आम्ही बाप्पांची मूर्ती बनवत असतो. चित्रातील डिटेल्सवरूनच मूर्तीचे मानधन ठरते, असे एका मूर्तिकाराने सांगितले.
advertisement
कारागीर मिळेना, मूर्ती महागल्या
सध्याच्या काळात शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. मात्र हा व्यवसाय ठराविक सिझनपुरता मर्यादित आहे. त्यामुळे तरुण पिढीकडे या व्यवसायाकडे लवकर वळत नाही. त्यामुळे मूर्ती बनवण्यासाठी कामगार मिळणे कठीण झाले आहे. पारंपरिक शाडू मूर्ती बनवण्यासाठी साधारण एक दिवस लागतो. तर थीमनुसार मूर्ती असेल तर 5 ते 6 दिवस लागतात. मूर्ती भाविकांच्या घरी आणि तिथून विसर्जन स्थळी सुखरुप जावी म्हणून योग्य ती काळजी घ्यावी लागते, असेही मुंबईतील एका मूर्तिकाराने सांगितले.
मराठी बातम्या/मुंबई/
Ganeshotsav 2025: बाप्पांच्या मूर्ती महागल्या! सव्वा फुटाच्या गणेशमूर्तीसाठी 15000 मोजावे लागणार, कारण काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement