Artificially Ripened Banana : तुम्ही कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेली केळी तर खात नाही ना? खरेदी करताना 'या' चुका टाळा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to identify chemically ripened bananas : केळी हे असे एक फळ आहे, जे आपल्या गोड चवीमुळे, पौष्टिकतेमुळे आणि सहज उपलब्धतेमुळे प्रत्येक घरात आवडीने खाल्ले जाते. यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B6 आणि फायबर आढळते, जे त्वरित ऊर्जा देण्यासोबतच पचन सुधारते आणि हृदयरोगांपासूनही संरक्षण करते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही जी केळी खात आहात, त्यात विष तर नाही ना? म्हणजेच ते धोकादायक केमिकल्सच्या मदतीने तर पिकवलेले नाही ना?
advertisement
केळीच्या देठाचा रंग नीट पाहा : केमिकलने पिकवलेली केळी ओळखण्याचा हा सर्वात पहिला आणि सोपा मार्ग आहे. जर केळीचा उरलेला भाग चमकदार पिवळा असेल, पण त्याचे देठ हिरवे आणि कडक असेल तर ती कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेली असण्याची शक्यता असते. हे केमिकल केळी बाहेरून पिवळी करते, पण देठ पूर्णपणे पिकू देत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्पर्श करून केळीचा पोत तपासा : केळीला हात लावून तिच्या मऊपणाचा अंदाज घ्या. वरून पिवळी दिसली तरी स्पर्श केल्यावर केमिकलने पिकवलेली केळी अनेकदा कडक आणि घट्ट वाटते. आतला गरही अनेकदा कच्चा आणि बेचव असतो. याउलट नैसर्गिकरित्या पिकलेली केळी स्पर्शाला थोडी मऊ आणि लवचिक असते. ती हलक्या दाबाने सहज दाबली गेली तर समजावे की ती आतून चांगली पिकलेली आणि मऊ आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








