Gold Silver Price Today: 1 लाख 75 हजार पोहोचलं सोनं, चांदीची किंमत काय?

Last Updated:
दिल्ली आणि मुंबईत सोन्याचा दर १,५६,००० रुपयांवर, चांदी ३,३०,१०० रुपयांवर पोहोचली. जागतिक तणावामुळे दरवाढ, लग्नसराईत सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.
1/6
जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खिशाला मोठा कात्री बसणार आहे. जागतिक बाजारपेठेतील तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतींनी आज ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी दिल्ली आणि मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये <a href = 'https://news18marathi.com/tag/gold-prices-today/'>सोन्याचे दर</a> गगनाला भिडले असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव चक्क १,५६,००० रुपयांच्या पुढे गेला आहे.
सोन्याचे दर</a> गगनाला भिडले असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव चक्क १,५६,००० रुपयांच्या पुढे गेला आहे." width="1600" height="900" /> जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खिशाला मोठा कात्री बसणार आहे. जागतिक बाजारपेठेतील तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतींनी आज ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी दिल्ली आणि मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर गगनाला भिडले असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव चक्क १,५६,००० रुपयांच्या पुढे गेला आहे.
advertisement
2/6
सोन्याच्या या भडकलेल्या दरामागे ग्रीनलँडवरून अमेरिका आणि युरोपीय महासंघातील वाढता तणाव कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव ४,८८८ डॉलर्स प्रति औंस इतका वाढला आहे. जेव्हा जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती किंवा आर्थिक संकट येते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याला सर्वात सुरक्षित मानतात, ज्यामुळे मागणी वाढून किमती वधारतात.

3/6
केवळ सोनेच नाही, तर चांदीनेही आज गुंतवणूकदारांना घाम फोडला आहे. चांदीचा दर आता ३,३०,१०० रुपये प्रति किलो या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव ९४.९१ डॉलर प्रति औंस इतका झाला आहे.

4/6
लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याचे दर अशा प्रकारे वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दागिने घडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्यासाठी आता प्रति तोळा (१० ग्रॅम) दीड लाखांच्या आसपास मोजावे लागत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत जागतिक तणाव निवळत नाही, तोपर्यंत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे.

5/6
मुंबईतील सराफ मार्केटमध्ये 1 लाख 61 हजार रुपये प्रति तोळा मोजावे लागणार आहेत. त्यात GST आणि घडणावळ मिळून 1 लाख 75 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबईत ज्यांना हे दागिने करायचे आहेत त्यांच्यासाठी १ लाख ७५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

6/6
मुंबईतील सराफ बाजारात एका दिवसांत १० हजारहून अधिक रुपयांनी दरवाढ झाली आहे. येत्या काळात ही दरवाढ कमी होणार नसून वाढण्याचीच शक्यता आहे. इतकं सगळं असतानाही लोक जुने दागिने मोडून 18, २० कॅरेट दागिने करत आहेत. लग्नसराईसाठी लोक हे करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Congress: पॉवर गेम ऑन! काँग्रेसचे ३० नगरसेवक 'नॉट रिचेबल', गट नोंदणीनंतर तातडीने अज्ञात स्थळी रवाना!
पॉवर गेम ऑन! काँग्रेसचे ३० नगरसेवक 'नॉट रिचेबल', गट नोंदणीनंतर तातडीने अज्ञात स्
  • राजकीय पक्षांकडून संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • दुसरीकडं काही जणांकडून सत्ता समीकरणाची जुळवाजुळव सुरू आहे.

  • काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement