Thane News : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा कायापालट होणार; सलग 90 दिवस नाटकांचे प्रयोग थांबण्याची शक्यता
Last Updated:
Thane Theatre Renovation : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील प्रेक्षकांसाठी अधिक आरामदायक आणि आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी फेब्रुवारीपासून तीन महिने नूतनीकरणासाठी बंद राहणार आहे
ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा परिसरातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह लवकरच नूतनीकरणासाठी बंद केले जाणार आहे. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार नाट्यगृहाचे नूतनीकरण येत्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल आणि सुमारे तीन महिने चालेल.
घाणेकर नाट्यगृहाचे रूप पालटणार
डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या सुधारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. या निधीचा उपयोग विविध कामांसाठी केला जाणार आहे. मंगळवारी आयुक्त सौरभ राव यांनी या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. बैठक दरम्यान जलरोधक उपाययोजना, जलवाहिन्यांचे काम, विद्युत उपकरणांची दुरुस्ती, प्रेक्षागृहातील प्रकाश आणि ध्वनी यंत्रणा, वातानुकूलन व्यवस्था आणि रंगमंचाची दुरुस्ती यावर चर्चा करण्यात आली.
advertisement
तसेच छतावरील उद्यान, स्वच्छतागृह सुधारणा, मलनिस्सारण वाहिनी दुरुस्ती, रंगमंचाचा पृष्ठभाग समतल करणे आणि प्रवेशद्वारांची पाहणी करून आवश्यक बदल करणे यांवर निर्णय घेण्यात आला. आयुक्त राव यांनी सांगितले की हा निधी पूर्णपणे नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठीच वापरण्यात येईल.
नूतनीकरणानंतर नाट्यगृह अधिक सुरक्षित, आरामदायक आणि आधुनिक सुविधांनी सज्ज होईल. स्थानिक रहिवासी आणि प्रेक्षकांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरेल. पालिकेच्या म्हणण्यांनुसार काम पूर्ण झाल्यानंतर नाट्यगृह पुन्हा सार्वजनिक वापरासाठी खुला होईल आणि येथील कलासृष्टीला चालना मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 9:43 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा कायापालट होणार; सलग 90 दिवस नाटकांचे प्रयोग थांबण्याची शक्यता








