Vasant Panchami 2026: वसंत पंचमीला घातक विषयोगाची बाधा; 3 राशींवर दु:खाचा डोंगर, मोठे नुकसान
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vasant Panchami 2026: वसंत पंचमीचा दिवस खास असतो, या दिवशी सरस्वती पूजन करण्याची मोठी परंपरा आहे. पण, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हा दिवस अनेक लोकांसाठी सावधगिरीचा इशारा असेल. दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी चंद्र मीन राशीत प्रवेश करेल, तिथे आधीच शनी विराजमान आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे विष योगाची निर्मिती होईल.
हा योग 25 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांपर्यंत प्रभावी राहील. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्म आणि संघर्षाचा कारक मानले जाते, तर चंद्र हा मन आणि भावनांशी संबंधित आहे. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात, तेव्हा मानसिक दबाव, आर्थिक अडचणी आणि नात्यात तणाव वाढू शकतो. वसंत पंचमीसारख्या शुभ दिवशी हा योग बनणे काही राशींसाठी आव्हानात्मक ठरेल.
advertisement
वृषभ : वसंत पंचमीला तयार होत असलेला विष योग वृषभ राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या काळात आर्थिक स्थिती खालावण्याची शक्यता आहे. अचानक खर्च वाढल्याने बजेट बिघडू शकते. आरोग्याशी संबंधित समस्या, विशेषतः पोटाचे विकार आणि निद्रानाश सतावू शकतो. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे नुकसानकारक ठरू शकते. गुंतवणूक करणे किंवा उधार देणे टाळावे.
advertisement
सिंह : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग करिअर आणि रिलेशनमध्ये तणाव आणू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मेहनतीनुसार फळ न मिळाल्याने मन अस्वस्थ राहील. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. जुन्या गोष्टींवरून वाद वाढू नये म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही वेळ सर्वात जास्त सतर्क राहण्याची आहे. विष योगाच्या प्रभावामुळे आरोग्य बिघडू शकते. जुना आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. याशिवाय एखादी वाईट बातमी मिळण्याची शक्यता असल्याने मानसिक तणाव वाढू शकतो. धनहानीचे योग असल्याने व्यवहारात विशेष काळजी घ्या. कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घेऊ नका.
advertisement
advertisement
याशिवाय 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे मन शांत राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात. गरजू व्यक्तीला अन्न किंवा वस्त्र दान करणे देखील शुभ मानले जाते. या उपायांमुळे विष योगाची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









