BMC Election Shiv Sena BJP: कैसे हराया! भाजपच्या बंडखोरांनी शिंदे गटाचाच केला गेम , आकेडीवारी पाहाल तर हैराण व्हाल

Last Updated:

BJP Shiv Sena Shinde: जागावाटपात शिवसेना शिंदे गटाने जास्त जागा घेतल्यामुळे महायुतीच्या नगरसेवकांची संख्या घटली, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात असतानाच आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

कैसे हराया! भाजपच्या बंडखोरांनी शिंदे गटाचाच केला गेम , आकेडीवारी पाहाल तर हैराण व्हाल
कैसे हराया! भाजपच्या बंडखोरांनी शिंदे गटाचाच केला गेम , आकेडीवारी पाहाल तर हैराण व्हाल
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनंतर आता पराभवाच्या कारणांचा किस पाडला जात आहे. जागावाटपात शिवसेना शिंदे गटाने जास्त जागा घेतल्यामुळे महायुतीच्या नगरसेवकांची संख्या घटली, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात असतानाच आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, भाजपच्या बंडखोर उमेदवारांमुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा गेम झाला असल्याचे समोर आले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दादर-माहीममधील पराभवानंतर शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी भाजपच्या एका टोळीकडून महायुतीविरोधात काम केल्याने पराभव झाल्याचे म्हटले. त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनीदेखील सरवणकरांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता भाजप-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

> बंडखोरी ठरली निर्णायक

advertisement
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता, भाजपच्या बंडखोरांनी शिंदे गटाच्या किमान १० उमेदवारांचा पराभव करण्यात मोठी भूमिका बजावली. ज्या १० जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला, तिथे भाजपच्या बंडखोरांनी घेतलेली मते निर्णायक ठरली आहेत. या बंडखोरांनी घेतलेली मते शिवसेनेला पडलेल्या मतांच्या फरकापेक्षा जास्त आहेत. म्हणजेच, जर ही बंडखोरी झाली नसती किंवा मते विभागली गेली नसती, तर शिवसेनेचे किमान १० उमेदवार अधिक निवडून आले असते.
advertisement

>> भाजप बंडखोरांमुळे शिवसेनेचे पडलेले उमेदवार

> अंधेरी पूर्व - वॉर्ड क्रमांक १२१ मध्ये शिवसेनेच्या प्रतिमा खोपडे यांचा अवघ्या १४ मतांनी पराभव झाला आहे. या प्रभागात भाजपच्या मंडल अध्यक्ष जयश्री वळवी यांनी बंडखोरी केली होती. वळवी यांनी १७५ मतं घेतली आहेत.
> दिंडोशी - वॉर्ड क्रमांक ४१ मधून मानसी पाटील या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार होत्या. त्यांचा अवघ्या ५९६ मतांनी पराभव झाला. त्या ठिकाणी भाजपचे स्थानिक पदाधिकारी दिव्येश यादव यांनी बंडखोरी केली होती. त्यांना १२६० मतं मिळाली आहेत.
advertisement
> अणुशक्ती नगर- प्रभाग क्रमांक १४३ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शोभा जयभाये यांना ९४३ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. तिथे भाजपच्या महिला तालुका अध्यक्ष स्वाती उम्रटकर यांनी बंडखोरी केली होती.
> कुर्ला- प्रभाग क्रमांक १६९ मध्ये शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय याचा ९७० मतांनी पराभव झाला. तिथे भाजपचे बंडखोर उमेदवार (जिल्हा कमिटी सदस्य) अमित शेलार यांनी तब्बल ३२२५ मतं घेतली आहेत.
advertisement
> वर्सोवा- प्रभाग क्रमांक ६१ मध्ये शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा २००५ मतांनी धक्कादायक पराभव झाला. या ठिकाणी भाजपच्या मंडळ अध्यक्ष उर्मिला गुप्ता यांनी बंडखोरी करून २७३७ मतं घेतली आहेत.
> दिंडोशी - प्रभाग क्रमांक ३९ मध्ये विनया सावंत यांचा २३५२ मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या मंडळ अध्यक्षाची पत्नी सुमन सिंग यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. तिथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला अपेक्षित सहकार्य केले नसल्याचा आरोप होतोय.
advertisement
> मागाठाणे – प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेनेच्या सुवर्णा गवस यांचा २८८४ मतांनी पराभव झाला. तिथे भाजपचे बंडखोर प्रिती दांडेकर यांना २७४५ मतं मिळाली आहे.
> वांद्रे पूर्व - पल्लवी सरमळकर यांचा प्रभाग क्रमांक ९४ मधून २३६० मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष रेश्मा मालुसरे यांनी बंडखोरी करून तब्बल ६८३२ मतं घेतली. ही बंडखोरी झाली नसती तर पल्लवी सरमळकर यांचा सहज विजय झाला असता.
advertisement
> सायन कोळीवाडा - प्रभाग क्रमांक १७३ मधून पूजा कांबळे या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांचा ४९७४ मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांना मिळालेली मतं आहेत ९३१०. केळूसकर या भाजपच्या मंडळ अध्यक्ष आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Shiv Sena BJP: कैसे हराया! भाजपच्या बंडखोरांनी शिंदे गटाचाच केला गेम , आकेडीवारी पाहाल तर हैराण व्हाल
Next Article
advertisement
Congress: पॉवर गेम ऑन! काँग्रेसचे ३० नगरसेवक 'नॉट रिचेबल', गट नोंदणीनंतर तातडीने अज्ञात स्थळी रवाना!
पॉवर गेम ऑन! काँग्रेसचे ३० नगरसेवक 'नॉट रिचेबल', गट नोंदणीनंतर तातडीने अज्ञात स्
  • राजकीय पक्षांकडून संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • दुसरीकडं काही जणांकडून सत्ता समीकरणाची जुळवाजुळव सुरू आहे.

  • काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement