बिडकीन येथे रमेश भारती हे खाजगी कंपनीमध्ये काम करत असत मात्र स्वतःचे वेगळे अस्तित्व असावे आणि स्वतःचा व्यवसाय असावा या हेतूने 2019 मध्ये त्यांनी माऊली वडापाव या नावाने नाश्ता सेंटर सुरू केले. मात्र काही वेळातच कोरोना या रोगाचे आगमन झाले आणि लॉकडाऊन झाले. त्यामुळे काही महिने वडापाव सेंटर बंद करावे लागले. मात्र हार न मानता लॉकडाऊन उघडल्यानंतर भारती यांनी पुन्हा जोमाने वडापाव सेंटर सुरू केले.
advertisement
Success Story: नोकरी सोडली, बिझनेसने तारलं; 'खरात बंधू'नी आर्थिक अडचणींवर 'आईच्या चवीने' मिळवले विजय
घरगुती पद्धतीचे मसाले वापरून त्यामध्ये अद्रक-लसूण पेस्ट, बटाटे चटणी, यासह शेंगदाणे मिरची चटणी ते स्वतः घरी तयार करतात. वडापावच्या चटकदार चवीमुळे खवय्ये छत्रपती संभाजीनगर, पैठण, चितेगाव, धुळे, नाशिक यासह विविध ठिकाणाहून वडापाव खाण्यासाठी गर्दी करत असतात.
नवीन वडापाव व्यवसाय कसा सुरू करावा?
वडापाव सेंटर किंवा हॉटेल व्यवसायात येण्यासाठी नवीन व्यवसायिकांनी त्यामध्ये विशेषतः तरुणांनी खाद्य क्षेत्रातला आणि व्यवसायातला अनुभव घ्यावा, तसेच स्वतःला काहीतरी करायचे अशी जिद्द मनाशी बाळगणे गरजेचे आहे. वडापाव व्यवसायामध्ये सातत्य आणि चिकाटी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे काम आहे तसेच तरुणांनी मोठ्या प्रमाणात या व्यवसायात यावे असे आवाहन देखील भारती यांनी तरुण वर्गाला केले आहे.