TRENDING:

RBI MPC Meeting 2025: सर्वसामान्यांचे अच्छे दिन! इनकम टॅक्सपाठोपाठ आता EMI मध्येही मिळणार सूट?

Last Updated:

RBI MPC Meeting 2025, RBI Repo Rate: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बैठकीत 25 बेसिस पॉईंटने रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. 6.50 टक्क्यांवरून रेपो रेट 6.25 टक्क्यांपर्यंत येईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

advertisement
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची MPC समितीची बैठक आजपासून 7 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या बैठकीदरम्यान रेपो रेटबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास याबाबत 7 तारखेला महत्त्वाची घोषणा करतील. इनकम टॅक्समध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलासा दिला. आता EMI मध्ये सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळणार का हे पाहावं लागणार आहे.
News18
News18
advertisement

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बैठकीत 25 बेसिस पॉईंटने रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. 6.50 टक्क्यांवरून रेपो रेट 6.25 टक्क्यांपर्यंत येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. याबाबत 7 फेब्रुवारीला निर्णय येईल. महागाई दर अजूनही 4 टक्क्यांहून अधिक आहे. आर्थिक सुस्ती, मार्केटची स्थिती आणि कॅश फ्लोला वाढवण्यासाठी उपाययोजना करत आहे. त्यात व्याजदर कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते.

advertisement

तज्ज्ञांच्या मते, फेब्रुवारीच्या एमपीसी बैठकीत रेपो दर कमी झाल्यास मागणी वाढण्यास मदत होईल. सरकारने 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना इनकम टॅक्स लागणार नाही असं म्हटलं आहे. व्याजदर कमी झाल्यामुळे कर्ज स्वस्त होतील, ज्यामुळे वापर आणि गुंतवणूक दोन्ही वाढतील. 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 6.4% राहण्याचा अंदाज आहे, जो गेल्या चार वर्षातील सर्वात कमी पातळी असेल.

advertisement

Gold Silver Price: शेअर मार्केट सोडाच! सोन्या चांदीच्या दरानं गाठला नवा विक्रम

डिसेंबरच्या सुरुवातीला, आरबीआयनेही जीडीपी वाढीचा अंदाज 7.2% वरून 6.6% पर्यंत कमी केला होता. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गौरा सेनगुप्ता यांच्या मते, "जानेवारीमध्ये भाज्यांच्या किमतीत घट झाल्यामुळे किरकोळ महागाई दर 4.5% पर्यंत खाली येऊ शकतो, ज्यामुळे व्याजदरात कपात होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो."

advertisement

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण झाली दोडकी', मुंबईतील 22 हजार महिलांचे अर्ज बाद?

आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जवळपास 11 वेळा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता. अकराही वेळा दर स्थिर ठेवण्यावर कमिटीने निर्णय घेतल्याचं त्यांनी मागच्या बैठकीदरम्यान सांगितलं होतं. रेपो रेटमध्ये कपात केल्यानं कर्जदाराच्या व्याजदरात कपात होईल. बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज देखील यामुळे स्वस्त होईल. याचा फायदा होमलोन आणि कार लोन घेणाऱ्यांना होऊ शकतो. EMI कमी झाला तर लोक अजून कर्ज घेतील, त्यामुळे बँकांकडे पैसे येईल असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र 7 तारखेला काय घोषणा होणार त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
RBI MPC Meeting 2025: सर्वसामान्यांचे अच्छे दिन! इनकम टॅक्सपाठोपाठ आता EMI मध्येही मिळणार सूट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल