Gold Silver Price: शेअर मार्केट सोडाच! सोन्या चांदीच्या दरानं गाठला नवा विक्रम

Last Updated:
Gold Silver Price: लग्न सराई, शेअर मार्केटमधील अस्थिरता, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आणि सराफा बाजारात मागणी वाढल्याने सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. जानेवारीपासून सोन्याचे दर वाढल्याचंच दिसत आहे. आता सोनं खरेदी करणं आवाक्याबाहेर चाललं आहे.
1/7
रुपयाचं मूल्य डॉलरच्या तुलनेत दिवसेंदिवस घसरत आहे. 1 डॉलरचं मूल्य जवळपास 87 रुपये झालं असताना आता सोन्या चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. होळीआधीच सोनं रेकॉर्ड ब्रेक किंमतीवर पोहोचलं आहे.

advertisement
2/7
सोमवारी सोन्याच्या किमतींमध्ये  400 रुपयांची वाढ झाल्यामुळे सोने  85,000 प्रती तोळावर पोहोचलं. 24 कॅरेट सोन्यानं हा नवा उच्चांक गाठला, ऑल टाइम हाय करत, सोन्याने नवा रेकॉर्ड नोंदवला आहे.

3/7
लग्न सराई, शेअर मार्केटमधील अस्थिरता, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आणि सराफा बाजारात मागणी वाढल्याने सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. जानेवारीपासून सोन्याचे दर वाढल्याचंच दिसत आहे. आता सोनं खरेदी करणं आवाक्याबाहेर चाललं आहे.

4/7
स्टॉक मार्केटमधील घट आणि गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायांमध्ये सोन्याचा विचार केला जात असल्यामुळे या दरवाढीला अधिक गती आली आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार, दिल्लीत सोन्याचा दर 85,300 रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

5/7
हा दर मागील विक्रमी किमतींनंतरचा नवा उच्चांक आहे. जागतिक पातळीवरील ताणतणाव आणि डॉलरच्या घसरणीमुळे भारतात सोन्याच्या किमतींमध्ये सतत वाढ होत आहे. सोन्याला 'सुरक्षित गुंतवणूक' मानले जाते, त्यामुळे शेअर मार्केटमधून लोक सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे शिफ्ट होत असल्याचंही मागच्या काही काळात दिसून आलं.

6/7
सोन्याबरोबरच चांदीच्या किमतींमध्येही तेजी आली आहे. सोमवारी चांदीचा दर 300 रुपयाने वाढून 96000 प्रती किलोवर पोहोचला आहे. सराफा बाजारात चांदीच्या मागणीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.

7/7
औद्योगिक वापर आणि दागिन्यांसाठी चांदीची मागणी वाढल्यामुळे ही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, चलनवाढ आणि मध्य बँकांकडून व्याजदरांतील बदल याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement