advertisement

सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, सोमवारी किंमत घसरणार; पैसे तयार ठेवा अक्षय तृतीयेपूर्वी होणार फेरबदल

Last Updated:

Gold Silver Price Next Week: मागील आठवड्यात मोठ्या घसरणीनंतर येत्या आठवड्यात सोने-चांदीच्या किमतीत मर्यादित रिकव्हरीची शक्यता व्यक्त केली जात आहे.मजबूत डॉलर, उच्च व्याजदर आणि जागतिक घडामोडी यांचा बाजारावर मोठा प्रभाव राहणार आहे.

News18
News18
मुंबई : उद्या म्हणजेच 23 मार्चपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये थोडी रिकव्हरी पाहायला मिळू शकते. मात्र ही तेजी मर्यादित राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार अमेरिकेतील, ब्रिटन आणि जपानमधील मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस PMI डेटा, कंझ्युमर सेंटिमेंट आणि जॉबलेस क्लेम्स यावर लक्ष ठेवतील. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतींचा ट्रेंडही बाजाराची दिशा ठरवणार आहे.
मागील आठवड्यात सोने-चांदीत मोठी घसरण
मागील आठवड्यात देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी 32,663 रुपयांनी म्हणजेच 12.59 टक्क्यांनी घसरून 2.26 लाख रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर सोने (Gold Price) 13,974 रुपयांनी म्हणजेच 8.82 टक्क्यांनी घसरून 1.44 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
सोने-चांदीच्या किमतींवर परिणाम
आठवड्याच्या मध्यात ही घसरण अधिक वाढली होती कारण अमेरिका, जपान, इंग्लंड आणि युरोपमधील केंद्रीय बँकांनी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाईबाबत चिंता व्यक्त केली. यामुळे लवकरच व्याजदर कपात होणार नाही, असा संकेत मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीत घसरण दिसून आली. चांदी वायदा 11.68 डॉलर म्हणजेच 14.36 टक्क्यांनी घसरून 69.66 डॉलर प्रति औंसवर आला, तर सोने 486.8 डॉलर म्हणजेच 9.6 टक्क्यांनी घसरून 4,574.9 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.
advertisement
सोने-चांदीची दिशा काय?
तज्ज्ञांच्या मते येत्या आठवड्यांत सोने मर्यादित पट्ट्यात व्यवहार करू शकते आणि त्यात चढ-उतार कायम राहतील. मजबूत डॉलर आणि उच्च व्याजदर यामुळे सोन्याच्या रिकव्हरीवर दबाव आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीबाबत कठोर भूमिका घेतल्यामुळे आणि ऊर्जा किमती वाढल्यामुळे धोरणात सवलत मिळण्याची शक्यता 2026 पर्यंत पुढे ढकलली गेली आहे. ज्याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर होत आहे.
advertisement
मात्र जागतिक केंद्रीय बँका दीर्घकालीन दृष्टीकोनातून सोन्याची खरेदी सुरू ठेवू शकतात. ज्यामुळे मागणी टिकून राहू शकते. भू-राजकीय कारणांमुळे काही प्रमाणात सपोर्ट मिळत असून, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने मोठी घसरण मर्यादित ठेवते. देशांतर्गत बाजारात लग्नाचा हंगाम आणि अक्षय तृतीया यांसारख्या सणांमुळे किमतींना काही प्रमाणात आधार मिळू शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, सोमवारी किंमत घसरणार; पैसे तयार ठेवा अक्षय तृतीयेपूर्वी होणार फेरबदल
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement