TRENDING:

तुम्ही ही चूक कराल तर फसाल, 1 एप्रिलपासून बदलणार ऑनलाइन पेमेंटचे नियम

Last Updated:

आरबीआयने १ एप्रिलपासून ऑनलाइन व्यवहारांसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन बंधनकारक केले. डायनॅमिक ओटीपी, फिंगरप्रिंटमुळे Google Pay PhonePe वापर अधिक सुरक्षित.

advertisement
आजकाल हातात पैसे फार कमी आणि फोनमध्ये जास्त, त्यातही गुगल पे किंवा फोन किंवा किंवा भीम अॅप वापरणाऱ्यांची संख्या जरा जास्तच आहे. त्यामुळे जे जे ऑनलाइन पेमेंट करतात त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. १ एप्रिलपासून तुमचे ऑनलाईन व्यवहार करण्याची पद्धत बदलणार आहे. सायबर गुन्हेगार आणि हॅकर्सपासून सर्वसामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआयने आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्तीचं केलं. यामुळे आता फक्त एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत, तर तुम्हाला सुरक्षेच्या दोन थरांतून जावं लागेल.
यूपीआय रुल्स
यूपीआय रुल्स
advertisement

नेमकं काय बदलणार?

आत्तापर्यंत आपण अनेकदा एकच स्टॅटिक पिन वापरून झटपट पेमेंट करायचो. पण आता बँकेला किंवा फिनटेक कंपन्यांना तुम्हाला दोन पर्याय द्यावे लागतील. यातला एक पर्याय डायनॅमिक असणं बंधनकारक आहे. म्हणजेच, तो कोड किंवा सुरक्षा निकष प्रत्येक व्यवहारासाठी वेगळा असेल आणि तो त्याच वेळी तयार होईल.

नेहमीचा पिन टाकावा लागेल आणि मोबाईलवर आलेला वन-टाइम पासवर्डही द्यावा लागेल. तुमच्या अंगठ्याचा ठसा किंवा फेस आयडी आणि तुमचं रजिस्टर असलेलं डिव्हाइस यांचा मेळ घातला जाईल. हार्डवेअर टोकन किंवा पासवर्डचा वापर करून ओळख पटवली जाईल.

advertisement

आरबीआयने या नियमात बँका आणि कार्ड कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. जर या नव्या सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीत कोणतीही कसर राहिली आणि त्यामुळे ग्राहकाची फसवणूक झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकेची किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरची असेल. यामुळे बँकांना आता आपली सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करावी लागणार आहे.

सामान्य माणसाला काय फायदा?

advertisement

समजा एखाद्या हॅकरला तुमचा पासवर्ड कळाला, तरीही जोपर्यंत तुमच्याकडे येणारा डायनॅमिक ओटीपी किंवा तुमचा फिंगरप्रिंट त्याच्याकडे नसेल, तोपर्यंत तो तुमच्या खात्यातून एक रुपयाही काढू शकणार नाही. केवळ देशातच नाही, तर परदेशात पैसे पाठवतानाही हे नियम लागू होतील. आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी हे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. ग्राहकाला कोणता सुरक्षा पर्याय सोपा वाटतो, हे निवडण्याची मुभा मिळणार आहे.

advertisement

डिजिटल इंडियाच्या प्रवासात हा बदल थोडा वेळखाऊ वाटू शकतो, पण तुमच्या कष्टाच्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी हे 'दोन हात' करणं आता गरजेचं बनलं आहे. त्यामुळे १ एप्रिलपूर्वी आपल्या बँक खात्याची माहिती आणि मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायला विसरू नका.

मराठी बातम्या/मनी/
तुम्ही ही चूक कराल तर फसाल, 1 एप्रिलपासून बदलणार ऑनलाइन पेमेंटचे नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल