मुंबई : ब्रोकरेज फर्म Axis Securities यांनी जानेवारी 2026 साठी काही निवडक शेअर्समध्ये गुंतवणुकीची शिफारस केली आहे. मजबूत फंडामेंटल्स, मागणीतील सुधारणा आणि सेक्टर-विशिष्ट ट्रिगर्समुळे या शेअर्समध्ये 16 टक्क्यांपासून ते थेट 54 टक्क्यांपर्यंत संभाव्य परतावा मिळू शकतो, असा फर्मचा अंदाज आहे. खाली Axis Securities च्या प्रमुख शिफारशी सविस्तरपणे दिल्या आहेत.
advertisement
बजाज फायनान्स (Bajaj Finance)
Axis Securities च्या मते, बजाज फायनान्स आपली मजबूत वाढीची वाटचाल पुढेही कायम ठेवू शकते.
AUM ग्रोथ: मध्यम कालावधीत 24–25% CAGR
रेटिंग: Buy
टारगेट प्राइस: 1,200 (आजची किंमत: 990.55 )
संभाव्य अपसाइड: 22%
FY27 पासून कोअर प्रोडक्ट्ससोबतच नव्या प्रोडक्ट लाईन्समुळे कंपनीच्या वाढीला आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
ब्रोकरेजच्या मते, मोठ्या बँकांमध्ये SBI चे कामगिरी सर्वाधिक मजबूत राहिली आहे.
रेटिंग: Buy
टारगेट प्राइस: 1,135 (आजची किंमत: 1,005.65 )
संभाव्य अपसाइड: 16%
जबाबदार प्राइसिंग स्ट्रॅटेजी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि मजबूत लायबिलिटी फ्रँचायझीमुळे SBI चा आउटलुक सकारात्मक असल्याचे Axis Securities चे म्हणणे आहे.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
रेटिंग: Buy
टारगेट प्राइस: 1,170 (आजची किंमत: 1,000.25)
संभाव्य अपसाइड: 18 %
Axis Securities ला FY26 मध्ये कर्जवाढीत वेग येईल, तर FY27 मध्ये आणखी मजबुती दिसेल, अशी अपेक्षा आहे. मार्जिनवरील दबाव हळूहळू कमी होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
भारती एअरटेल (Bharti Airtel)
रेटिंग: Buy
टारगेट प्राइस: 2,530 (आजची किंमत: 2,108.50)
संभाव्य अपसाइड: 20%
मजबूत मार्जिन, नव्या सबस्क्रायबरची भर आणि 4G कन्वर्जनमुळे कंपनीच्या कामगिरीला पाठबळ मिळत असल्याचे ब्रोकरेजने नमूद केले आहे.
अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स (DMart)
रेटिंग: Buy
टारगेट प्राइस: 4,960 (आजची किंमत: 3,721.00)
संभाव्य अपसाइड: 31%
FY26 च्या दुसऱ्या सहामाहीत सणासुदीचा हंगाम आणि सुधारलेली ग्राहक मागणी यामुळे हाय-मार्जिन सेगमेंटमध्ये मजबूत वाढ होण्याची शक्यता Axis Securities ने व्यक्त केली आहे.
इनॉक्स विंड (Inox Wind)
टारगेट प्राइस: 190 (आजची किंमत: 127.65)
संभाव्य अपसाइड: 54%
Inox Green Energy Services आणि Resco Global मधील अल्पमत हिस्सा (Minority Stake) समायोजित केल्यानंतर हे टारगेट निश्चित करण्यात आले आहे.
किर्लोस्कर ब्रदर्स (Kirloskar Brothers)
रेटिंग: Buy
टारगेट प्राइस: 2,330 (आजची किंमत: 1,640)
संभाव्य अपसाइड: 45%
मजबूत ऑर्डर बुक आणि स्थिर मागणीच्या आधारावर मध्यम कालावधीत डबल-डिजिट महसूलवाढ (Revenue Growth) अपेक्षित असल्याचे ब्रोकरेजचे मत आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank)
टारगेट प्राइस: 65
संभाव्य अपसाइड: 23%
Axis Securities ला दुसऱ्या सहामाहीत (H2) चांगली रिकव्हरी, स्थिर मार्जिन आणि घटती क्रेडिट कॉस्ट दिसण्याची अपेक्षा आहे.
एपीएल अपोलो ट्यूब्स (APL Apollo Tubes)
रेटिंग: Buy
टारगेट प्राइस: 2,100 (आजची किंमत: 1,930.20)
भारतामधील पायाभूत सुविधा (Infrastructure) क्षेत्राला मिळणाऱ्या चालनेचा कंपनीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. FY25 ते FY27E दरम्यान EBITDA ग्रोथ सुमारे २९% CAGR राहील, असा अंदाज आहे.
महानगर गॅस (Mahanagar Gas)
टारगेट प्राइस: 1,540 (आजची किंमत: 1,146)
संभाव्य अपसाइड: 36%
Axis Securities ने कंपनीच्या नेट कॅश आणि गुंतवणुकीचे मूल्य 30% डिस्काउंटसह धरून हे टारगेट निश्चित केले आहे.
Axis Securities च्या मते 2026 च्या सुरुवातीला हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी ठरू शकतात. मजबूत बॅलन्स शीट, सेक्टरमधील सकारात्मक ट्रेंड आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता यामुळे या शेअर्सची शिफारस करण्यात आली आहे.
Disclaimer: वरील माहिती तज्ञांनी व्यक्त केलेले विचार आणि गुंतवणूक टिप्स त्यांचे स्वतःचे आहेत. वेबसाइट किंवा तिच्या व्यवस्थापनाचे नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
