TRENDING:

तुमचा EMI कमी होणार की वाढणार? आरबीआय घेतले 5 मोठे निर्णय, बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट

Last Updated:

RBI Big News : भारतीय रिझर्व्ह बँकने 8 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांवर होणार आहे.

advertisement
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 8 एप्रिल 2026 रोजी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले असून त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) ची तीन दिवसांची बैठक 8 एप्रिल रोजी पार पडली आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पाच महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
News18
News18
advertisement

निर्णय क्रमांक 1 : रेपो दर स्थिर

आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी फेब्रुवारीमध्येही दर स्थिर ठेवण्यात आले होते, तर डिसेंबरमध्ये 25 बेसिस पॉइंटने कपात करण्यात आली होती. यासोबतच SDF दर 5% आणि MSF दर 5.5% वर कायम ठेवण्यात आले आहेत. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

advertisement

निर्णय क्रमांक 2 : महागाईचा अंदाज

आरबीआयने महागाईबाबतही महत्त्वाचे अपडेट दिले आहे. आर्थिक वर्ष 2026-27 (FY27) साठी CPI महागाईचा अंदाज 4.6% ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रथमच कोअर महागाईचा अंदाजही जाहीर करण्यात आला असून तो 4.4% राहण्याचा अंदाज आहे.

निर्णय क्रमांक 3 : एल निनोचा धोका

आरबीआयने एल निनो (El Nino) हा महागाईसाठी मोठा धोका ठरू शकतो असा इशारा दिला आहे. एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते; ज्याचा परिणाम शेतीवर होतो. त्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खर्चावर होऊ शकतो.

advertisement

निर्णय क्रमांक 4 : GDP वाढीचा अंदाज

आरबीआयने चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठी देशाच्या वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज 6.9% ठेवला आहे. यापूर्वी 2025-26 मध्ये हा दर 7.6% होता. तिमाहीनिहाय अंदाजही जाहीर करण्यात आला आहे.

पहिली तिमाही (Q1) : 6.8%

दुसरी तिमाही (Q2) : 6.7%

तिसरी तिमाही (Q3) : 7%

चौथी तिमाही (Q4) : 7.2%

advertisement

निर्णय क्रमांक 5 : विदेशी चलन साठा मजबूत

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की 3 एप्रिलपर्यंत भारताचा विदेशी चलन साठा 697.10 अब्ज डॉलर (69,710 कोटी डॉलर) इतका होता. देशाकडे सुमारे 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा विदेशी चलन साठा उपलब्ध आहे. ज्यामुळे बाह्य आर्थिक धक्क्यांना तोंड देण्यास मदत होते.

मराठी बातम्या/मनी/
तुमचा EMI कमी होणार की वाढणार? आरबीआय घेतले 5 मोठे निर्णय, बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल