जगप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार आणि 'रिच डॅड पुअर डॅड' या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर इशारा दिला आहे. कियोसाकी यांच्या मते, जगातील सर्वात मोठा Debt Bubble म्हणजेच कर्जाचा फुगा लवकरच फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठं आर्थिक संकट ओढवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
फिएट करन्सी आणि बॉन्डमध्ये गुंतवणूकधारकांना धोका
advertisement
कियोसाकी यांनी टविट करुन याबाबत मोठा विधान केलं. जे या आर्थिक संकटासाठी तयार नाहीत, त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं." विशेषतः जे लोक पारंपरिक फिएट करन्सी आणि बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करत आहेत, त्यांना मोठा फटका बसू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
चांदीला सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून मान्यता
कियोसाकी यांच्या मते, सध्या चांदी हे सर्वात चांगलं गुंतवणुकीचं माध्यम आहे. सध्या चांदीच्या किमती ऐतिहासिक उच्चांकाच्या तुलनेत सुमारे 60 टक्के कमी आहेत. जून 2025 मध्ये चांदी 35 डॉलर प्रति औंसच्या आसपास आहे. त्यामुळे आता गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम वेळ आहे," असं ते म्हणाले. चांदीमध्ये तुम्ही कॉइन घेऊन गुंतवणूक करू शकता. याशिवाय तुमच्याकडे सिल्वर ETF चा पर्याय देखील आहे.
2 आठवड्यांतील सर्वात कमी भाव! सोनं खरेदीसाठी योग्य वेळ आली? तज्ज्ञांनी दिलं थेट उत्तर
सोने आणि बिटकॉइनबाबतही सल्ला
कियोसाकी यांनी यावेळी स्पष्ट केलं की, सध्या सोने आणि बिटकॉइनच्या किमती उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यापूर्वी किंमतीत थोडी घसरण व्हावी, याची ते वाट पाहत आहेत. किंमतीत करेक्शन आल्यानंतर मी स्वतःची हिस्सेदारी वाढवणार आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे आता सोनं किंवा बिटकॉइनमध्ये गडबडीनं गुंतवणूक करणं तोट्याचं ठरू शकतं असंही ते सांगायला विसरले नाहीत.
अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज चिंतेचा विषय
अमेरिकेच्या वाढत्या कर्जाबाबत बोलताना कियोसाकी म्हणाले की, सध्या अमेरिका 36.22 ट्रिलियन डॉलरच्या राष्ट्रीय कर्जाखाली आहे आणि बेरोजगारी दरही 4.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय बँकांच्या ढिसाळ धोरणांमुळे आणि सरकारी खर्चामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर होईल. शिवाय अमेरिकेतील एकूण सध्याची स्थिती पाहता जागतिक मार्केटमध्येही दबाव वाढत आहे.
Gold Rate: खरंच सोनं स्वस्त होणार की तोळ्याचे दर 1,20,000 रुपयांवर जाणार? तुमच्या प्रश्नांचं उत्तर
भारतीय बाजारातील सोनं-चांदीचे दर
दरम्यान, भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमती उच्च पातळीवर आहेत. सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 98,756 रुपयांवर आहेत, तर चांदी किलोमागे 1,09,800 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीची मागणी जगभरात वाढत आहे. चांदीचा वापर उपकरणांमध्येही केला जातो, त्यामुळे येत्या काळात चांदी 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंतचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे असा काही तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे तुम्ही चांदीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं.
गुंतवणूकदारांना सावधानतेचा सल्ला
जगभरातील भू-राजकीय तणाव, अमेरिका-चीन व्यापार वाद, मध्यपूर्वेतील अस्थिरता आणि केंद्रीय बँकांच्या धोरणांमुळे बाजारात अनिश्चितता वाढत आहे. कियोसाकी यांचा सल्ला स्पष्ट आहे . संपत्ती वाचवायची असेल तर गुंतवणुकीत विविधता ठेवा आणि सोनं, चांदी, बिटकॉइनकडे वळा.
