Gold Rate: खरंच सोनं स्वस्त होणार की तोळ्याचे दर 1,20,000 रुपयांवर जाणार? तुमच्या प्रश्नांचं उत्तर
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Gold rate Hike: सध्याच्या काळात सोने-चांदीचे दर एक लाखांच्या पार गेले आहेत. सोनं येत्या काळात स्वस्त होणार की पुन्हा महागणार? याबाबत जाणून घेऊ.
जालना: जागतिक स्तरावर असलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याचे-चांदीचे दर सातत्याने वाढत आहेत. पुन्हा एकदा सोने आणि चांदीने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. जीएसटीसह 1 लाख 1 हजार ते 1 लाख 2 हजार रुपये प्रति तोळा या दराने सोन्याची विक्री होत आहे. इराण-इस्त्राईलमध्ये सुरू असलेला संघर्ष देखील सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. याच दरवाढीची कारणे जालना येथील सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीधरलाल लाधानी यांच्याकडून जाणून घेऊ.
जागतिक पातळीवर असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात मागील काही दिवसांमध्ये चार ते पाच हजारांनी वाढ झाली आहे. 95-96 हजार रुपये प्रति तोळा विक्री होणारं सोनं आता आता जीएसटीसह एक लाख एक हजार रुपये प्रति तोळा या भावाने विक्री होत आहे. तर चांदी देखील प्रति किलो एक लाख 8 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
advertisement
रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेले दीर्घकालीन युद्ध, त्याचबरोबर इराण, इस्त्राईल आणि अमेरिका या तीन देशांदरम्यान सुरू असलेला संघर्ष यामुळे जागतिक बँका सोने खरेदी करत आहेत. या चढाओढीमुळे देखील सोन्याचे दर वाढले असल्याचे जालना सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीधर लाल लधानी यांनी सांगितले.
advertisement
ग्राहकांनी निवडला हा पर्याय
सोने हे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानले जाते, त्यामुळे प्रत्येक देशाच्या जागतिक बँका या सोन्यामध्ये अधिकची गुंतवणूक करत आहेत. तर दुसरीकडे ग्राहकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ग्राहक नवीन दागिने खरेदी करण्यापेक्षा जुने दागिने घेऊन येऊन त्या बदल्यात नवीन दागिने घेऊन जात असल्याचा कल पाहायला मिळत आहे. सध्या 30 ते 40 टक्के ग्राहक हे जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने घेऊन जात आहेत, असेही लाधानी सांगतात.
advertisement
युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर सोन्याचे दर 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. तर हीच परिस्थिती विरुद्ध झाली तर मात्र सोन्याचे दर 90 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली येऊ शकतात, अशी शक्यता गिरीधरलाल लाधानी यांनी व्यक्त केली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
June 25, 2025 10:06 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Rate: खरंच सोनं स्वस्त होणार की तोळ्याचे दर 1,20,000 रुपयांवर जाणार? तुमच्या प्रश्नांचं उत्तर