Women Success Story: व्यवसाय करण्यासाठी नोकरी सोडली, बनवला ज्वेलरी ब्रँड, महिन्याला 1 लाखांची कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Women Success Story: जिद्द, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर तयार झालेला हिरकणी हा ज्वेलरी ब्रँड आता अधिक भक्कम पायावर उभा राहत आहे. यामधून अदिती फाटक महिन्याला 1 लाखांची कमाई करतात.
मुंबई: जिद्द, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर तयार झालेला हिरकणी हा ज्वेलरी ब्रँड आता अधिक भक्कम पायावर उभा राहत आहे. अदिती फाटक यांनी सुरू केलेल्या या ब्रँडला आता 10 वर्षे पूर्ण होत असून, नुकताच त्यांनी स्वतःचा स्टुडिओ हिरकणी स्टायलिश टच या नावाने सुरू केला. यामधून त्या महिन्याला 1 लाखांची कमाई करतात.
आवड म्हणून सुरू केलेल्या या प्रवासाची सुरुवात अगदी साधी होती. क्रिएटिव्ह कामांची आवड असल्याने अदिती यांनी ग्राफिक डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आणि त्या क्षेत्रात काही काळ नोकरीही केली. मात्र, मन कुठेतरी स्वतःचं काहीतरी करण्याच्या दिशेने वळत होतं.
advertisement
एका वस्तू बनवण्याच्या कोर्समधून त्यांनी हस्तकला दागिन्यांची निर्मिती शिकली. सुरुवातीला हे दागिने नातेवाईकांना गिफ्ट म्हणून दिले जात होते. त्यांच्या कौतुकातून आत्मविश्वास वाढला आणि हळूहळू हा छंद व्यवसायात रूपांतरित झाला.
एक्झिबिशनमध्ये भाग घेतल्यानंतर ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. याच प्रेरणेतून स्वतःचा स्टुडिओ उघडण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि आता ते साकार झालं आहे. छोट्या बाळाची काळजी घेत आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी हिरकणी ब्रँड पुढे नेला. एक्झिबिशनमध्ये भाग घेतल्यानंतर मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्यांच्या प्रवासातलं एक महत्त्वाचं वळण ठरलं.
advertisement
हिरकणी या ब्रँडखाली अदिती फाटक विविध प्रकारची सुंदर, नाजूक आणि पूर्णतः हँडमेड दागिने तयार करतात. स्थानिक ग्राहकांपासून ते ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत या ब्रँडची ओळख आता विस्तारली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 23, 2025 3:21 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: व्यवसाय करण्यासाठी नोकरी सोडली, बनवला ज्वेलरी ब्रँड, महिन्याला 1 लाखांची कमाई