2 आठवड्यांतील सर्वात कमी भाव! सोनं खरेदीसाठी योग्य वेळ आली? तज्ज्ञांनी दिलं थेट उत्तर

Last Updated:

2 आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण! आजच खरेदी करावं का? तज्ज्ञांनी दिलं थेट उत्तर

News18
News18
अलीकडेच सोन्याच्या किमतीनं विक्रमी पातळी गाठली होती. पण आता त्यात थोडी स्थिरता आली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं सुमारे 3300 डॉलर ते 3400 डॉलर दरम्यान व्यवहार करत आहे. सोनं 3400 डॉलरवर येऊनही सोनं पुढे जात नाही उलट खाली घसरत आहे. त्यामुळे अनेक ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार सध्या ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये गेले आहेत.
ट्रेडिंग करणाऱ्यांचं म्हणणं आहे की, जेव्हा सोनं 3400 डॉलरच्या वर ठामपणे बंद होईल, तेव्हाच नव्या तेजीची सुरुवात मानली जाईल. याउलट, जर सोन्याची किंमत 3300 डॉलर किंवा 3250 डॉलरच्या खाली गेली, तर काहीशी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल्पकालीन व्यापार करणाऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.
लाँग टर्म गुंतवणूकदारांसाठी:
तुमची सोन्यात आधीपासून गुंतवणूक असेल, तर अजिबात घाबरू नका. सध्याची किंमत थोडी खाली-वर होणं हे साहजिक आहे. ही एक एक छोटी विश्रांती असं समजायचं, विकायची घाई करायची नाही म्हणजे थोडा ब्रेक घेतल्यासारखं. दीर्घकाळात सोन्याचे भाव पुन्हा चढू शकतात.
advertisement
शॉर्ट टर्म ट्रेडर्ससाठी:
सोनं 3400 डॉलच्या वर बंद झालं, तरच नव्या पोजिशन्स घ्या. नाहीतर थोडा वेळ वाट पाहा. आताच खरेदी केली तर तोटा होऊ शकतो. अति घाई संकटातही नेऊ शकते त्यामुळे थोडं सबुरीनं दर कसे चालतात त्याचा ट्रेन्ड लक्षात घेऊनच सोनं खरेदी करा.
advertisement
एसआयपी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी:
जर तुम्ही दर महिन्याला थोडं थोडं गुंतवत असाल, तर ही सवय चालूच ठेवा. कारण सोन्याचा आधार अजूनही मजबूत आहे. हे दीर्घकाळासाठी चांगलं परतावं देतं. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य ठेवा. सोन्या चांदीत अशी गुंतवणूक करणं फायद्याचंच राहील.
advertisement
पुढे काय होऊ शकतं?
जर इराण-इजरायलमधला तणाव वाढला किंवा अमेरिका-फेडकडून काही मोठा धोरणात्मक बदल झाला, तर सोनं पुन्हा 3400 डॉलर पार करू शकतं. पण तसं होईपर्यंत बाजार शांत राहील. केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया म्हणतात, सध्या सोनं जरा जास्त महाग आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत त्यात १० ते १५ टक्क्यांची घसरण होऊ शकते. त्यामुळे अजून गुंतवणूक करताना जपून पावलं टाका. सोन्यातील सध्याची स्थिरता ही तात्पुरती आहे. नवे ट्रिगर आल्यावर तेजी पुन्हा येऊ शकते. त्यामुळे घाई न करता विचारपूर्वक गुंतवणूक करावी. संयम ठेवा, फायदा तुमचाच होईल!
मराठी बातम्या/मनी/
2 आठवड्यांतील सर्वात कमी भाव! सोनं खरेदीसाठी योग्य वेळ आली? तज्ज्ञांनी दिलं थेट उत्तर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement